महात्मा गांधी खरंच वर्णद्वेषी होते?

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महात्मा गांधी

जगभरात महात्मा म्हणून नावाजलेल्या गांधीजींवर वर्णद्वेषाचा आरोप आफ्रिकेतल्या घाना देशात करण्यात आला आहे. घानाची राजधानी अक्करा शहरातल्या घाना विद्यापीठातून गांधीजींचा पुतळा याच कारणासाठी हटवण्यात आल्याची घटना घडली आहे.

हा पुतळा हटवला जावा यासाठी इथले विद्यार्थी दोन वर्षांपासून आंदोलन करत होते. यासाठी कोर्टात याचिकाही करण्यात आली होती. अखेर हा पुतळा विद्यापीठातून हटवला गेला आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी बीबीसीसोबत संवाद साधताना सांगितलं की, "महात्मा गांधींनी आफ्रिकन लोकांबद्दल वर्णद्वेषी विधानं केली होती. त्यामुळे त्यांचा अभिमान आम्ही का बाळगावा? त्यांच्याऐवजी आफ्रिकन नेत्याचा पुतळा इथे बसवला जावा."

गांधीजींच्या आफ्रिकेतल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी ही कथित वर्णद्वेषी विधानं केली होती. त्यांनी १९०४मध्ये एका पत्रात आफ्रिकन लोकांना काफीर म्हटल्याचा दाखलाही देण्यात आला आहे.

गांधीजींनी आफ्रिकन वंशाच्या लोकांवर नेमकी कधी आणि कोणती धक्कादायक विधान केली होती, याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहायला मिळेल.

बीबीसी विश्व बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)