पूर्व अंटार्क्टिका वितळणं ही आपल्यासाठी धोक्याची घंटा

फोटो स्रोत, Getty Images
हवामान बदलांमुळे होणाऱ्या परिणामांबाबत नासाने नुकतंच एक गंभीर सुतोवाच केलं आहे. पूर्व अंटार्क्टिकामधले मोठे हिमनग वितळण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राचं तापमान बदलत आहे आणि ते अंटार्क्टिकामधल्या बर्फापर्यंत पोहोचत आहे. यामुळे भविष्यात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून किनारपट्टीच्या शहरांना त्यापासून धोका पोहचू शकतो. मुंबईसारख्या किनारपट्टीवरच्या शहरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
जगभरातल्या अनेक शहरांवर याचा परिणाम होणार आहे. वितळणाऱ्या बर्फाच्या प्रत्येक थेंबाचा किनारपट्टीवर राहणाऱ्या प्रत्येकाला धोका आहे आणि म्हणूनच सगळ्या जगाचं याकडे लक्ष लागून राहिलं आहे. पोलंडमध्ये पार पडत असलेल्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
खाली दिलेल्या बीबीसी विश्व बुलेटीनच्या युट्यूब लिंकमध्ये तुम्हाला याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट पाहायला मिळेल. तसंच, हा व्हीडिओ बीबीसी न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलवरही पाहायला मिळेल.
तुम्ही बीबीसी विश्व बुलेटीन सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




