गे बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी त्याने केली बायकोची हत्या

फोटो स्रोत, Family Photo
बॉयफ्रेंडबरोबर राहता यावं म्हणून बायकोची हत्या करणाऱ्या एका औषधविक्रेत्याला कमीत कमी 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मितेश पटेल (वय 37) यांनी त्यांची बायको जेसिका (वय 34) चा गळा दाबून खून केला. त्यानंतर घरी दरोडा पडल्याचा बनाव रचला. हा घटनाक्रम 14 मे रोजी इंग्लंडमधल्या मिडल्सब्रफमध्ये घडला आहे.
मितेश यांनी बायकोच्या विम्याची 2 मिलियन पाऊंड इतकी रक्कम घेऊन आपला प्रियकर डॉ. अमित पटेल यांच्याबरोबर राहण्याचा कट रचल्याचा युक्तिवाद न्यायधीशांसमोर करण्यात आला होता.
पटेल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना कमीत कमी 30 वर्षं तुरुंगात काढावी लागतील, असं सांगण्यात आलं आहे.
ही शिक्षा सुनावताना न्या. गोस म्हणाले, "तुम्ही केलेल्या कृत्याचा तुम्हाला अजिबात पश्चात्ताप झालेला दिसत नाही. दया दाखवायचीच होती तर तुम्ही स्वत:वर दाखवायला हवी होती."
ते म्हणाले, "तुमच्या बायकोचं तुमच्यावर नक्कीच प्रेम होतं. तिला तुमच्याकडून फक्त प्रेम आणि एक सुरळीत आयुष्य हवं होतं. मात्र अडचण अशी आहे की तुम्हाला तिच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं लैंगिक आकर्षण नव्हतं. तुम्ही पुरुषांकडे आकर्षित होतात."
"तुमच्या बायकोला तुमच्या लैंगिकतेबाबत थोडीफार कल्पना होती आणि त्यामुळेच ती अतिशय एकटी, उदास आणि तुमच्या वर्चस्वाखाली दबलेली होती," ते पुढे म्हणतात.
न्यायाधीशांच्या मते त्यांच्यासमोर पटेल यांचे जे मेसेजेस सादर झाले ते सगळे मतलबी स्वरुपाचे होते. पटेल यांनी आपल्या बायकोचा वापर मतलबासाठी केला.

फोटो स्रोत, Cleveland Police
दोन आठवडे चाललेल्या या खटल्यात कोर्टानं पटेल यांचा युक्तिवाद ऐकला. पटेल यांचं औषधाचं दुकान आहे. Grindr या डेटिंग अप द्वारे त्यांनी अनेक पुरुषांशी संबंध प्रस्थापित केले होते.
पटेल यांच्या मते त्यांची बायको त्यांची सगळ्यांत चांगली मैत्रीण होती. मात्र त्यांनी गळा दाबण्याधी तिला इन्सुलिनचं इंजेक्शन टोचलं. त्यानंतर एका बॅगच्या सहाय्याने तिचा गळा आवळला.
नरकात जा
त्यानंतर एका टेपने तिचा मृतदेह बंधला आणि दरोड्याचा बनाव रचण्यासाठी त्याने घर अस्ताव्यस्त केलं.
सरकारी वकील निकोलस कँपबेल म्हणाले, "प्लॅस्टिक बॅगेचा गळा दाबण्यासाठी वापर करण्यात आला."
जेसिका पटेल यांच्या वतीने त्यांची बहीण दिव्याने एक निवेदन कोर्टात वाचलं. ते म्हणाले, "आम्ही अशी प्रार्थना केली की तिच्या शेवटच्या क्षणांत तिला वेदना होऊ नये. मात्र कटू वास्तव असं आहे की तिला वेदना झाल्या. तिचा खूनी कोण आहे हे तिला नक्की माहिती होतं. तिने आपलं आयुष्य वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्याने काहीही दयामाया दाखवली नाही."
"आता आपलं आयुष्य संपणार याची कल्पना आल्यावर तिला ज्या वेदना झाल्या त्या आम्ही समजू शकतो. तो क्षण आठवला तरी आमच्या अंगावर काटा येतो."
आपल्या मेहुण्याला उद्देशून त्या म्हणतात, "तुझ्या छळापासून तिला मुक्ती मिळेल हे आम्हाला माहिती होतंच. ती स्वर्गात सुखी राहील, तू मात्र नरकात सडशील."

फोटो स्रोत, Cleveland Police
त्यापुढे म्हणाल्या, "तो तिला घटस्फोट देऊन हवं ते घेऊन जाऊ शकत होता. त्याने तिला मारण्याची काहीच गरज नव्हती. हे पाऊल उचलण्याची त्याला काहीच गरज नव्हती. "
पटेल यांनी त्याच्या प्रियकराला सांगितलं होतं की त्याने लग्न केलं कारण ती त्याची लैंगिक ओळख लपवण्यासाठी मदत करणार होती.
ऑस्ट्रेलियाला जाऊन जेसिका यांनी IVF तंत्रज्ञानाने जन्माला घातलेल्या मुलाला वाढवण्याचं मितेश यांनी ठरवलं होतं.
पटेल यांच्या बायकोने तीन वेळा IVFचे उपचार घेतले होते. काही दिवसांपूर्वी उपचार यशस्वीसुद्धा झाले होते. मात्र त्यापूर्वीच जेसिका यांची हत्या झाली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








