अयोध्येत उद्धव : 'सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, शिवसेना मदत करेल'

फोटो स्रोत, BBC/Niranjan Chhanwal
सरकारने राम मंदिरा बांधण्यासाठी अध्यादेश आणावा, शिवसेना त्यासाठी सहकार्य करेल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत मांडली. उद्धव ठाकरे यांच्या 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्याला शनिवारपासून सुरुवात झाली. लक्ष्मण किला इथं कलश पूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.
उद्धव यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेनेतील प्रमुख नेते आहेत.
राम मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी दसरा मेळाव्याला या अयोध्या यात्रेची घोषणा केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात शनिवारी झालेल्या ठळक घडामोडी अशा :

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सायंकाळी 5.55 : शरयू नदीकाठी महाआरती
उद्धव ठाकरे शरयू नदीच्या काठी पोहचले असून तिथं महाआरती सुरू झाली आहे. या आरतीसाठी नदीच्या काठावर सजावट करण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1

सायंकाळी 4.40 : 'मंदिरासाठी अध्यादेश आणा, शिवसेना मदत करेल'

फोटो स्रोत, Twitter
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी लढाई करायला आलेलो नाही. निवडणुका आल्या म्हणूनही आलेलो नाही. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला आलो आहे. मी पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे. आता नेहमी येत राहू. सगळ्यांनी मिळून मंदिर बनवलं तर लवकर होईल. मी श्रेय घ्यायला आलेलो नाही. मंदिर झालं की मी स्वतः भक्त म्हणून दर्शनाला येणार आहे. जर सरकार अध्यादेश आणत असेल तर शिवसेना मदत करेल. नोटाबंदीच्या वेळी कोर्टाचा विचार केला नाही, तर राम मंदिर उभारणीत का याचा विचार केला जात आहे? मला राममंदिराचं श्रेय नको आहे."

फोटो स्रोत, Amit Bhadricha@Twitter
छाती किती मोठी याला महत्त्व नाही, तर त्यात धाडस असलं पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2

दुपारी 4.30 :उद्धव यांच्या हस्ते कलश पूजन
लक्ष्मण किला इथं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी यांच्या हस्ते लक्ष्मण कलश पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. संतांच्या उपस्थितीत पूजा आणि आशीर्वादोत्सव अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे कुटुबीयांकडून संकल्पपूजा झाली.

फोटो स्रोत, Siddhesh R Kadam@twitter

लक्ष्मण किला परिसरा जमलेले शिवसैनिक

फोटो स्रोत, Twitter

फोटो स्रोत, Twitter

दुपारी 3.30 - उद्धव, आदित्य ठाकरे यांचे लक्ष्मण किला इथं आगमन. 'जय श्रीराम,' 'राम मंदिर की करो तयारी, आ रहा है भगवाधारी' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

फोटो स्रोत, Twitter

फोटो स्रोत, Twitter

दुपारी 2. 40 वाजता
लक्ष्मण किला इथं व्यासपीठावर संतांचे आगमन

दुपारी 1.00 वाजता : बाबा रामदेव यांची मंदिर उभारणीची मागणी
बाबा रामदेव यांनी मंदिर तातडीने उभारणीची मागणी केली आहे. ते म्हणाले, "लोकांचा संयम संपत आहे. राम मंदिर उभारणीसाठी कायदा करावा, अन्यथा लोक स्वतःच राम मंदिराची उभारणी सुरू करतील. अशा परिस्थितीमध्ये धार्मिक सलोखा बिघडू शकतो. रामाला देशात कुणाचा विरोध नाही. सर्व हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन रामाचे वंशज आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3

अयोध्येच्या आठवणींनी 'सर' भावुक
अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अयोध्येच्या निमित्ताने बोलताना ते भाऊक झाले.
"मी 1992 मध्ये अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेब मला निरोप देण्यासाठी सेनाभवनला आले होते. आमचं विमान अयोध्येला न थांबता कोलकात्याला नेण्यात आलं. मी ट्रेनने अयोध्येला गेलो. मात्र तोपर्यंत अयोध्येची तारीख उलटून गेली होती. त्यामुळे आम्हाला जाता आलं नव्हतं. आमचं अपुरं राहिलेलं कार्य आज उद्धव ठाकरे पूर्ण करत आहेत. त्यांना शुभेच्छा देणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी मातोश्रीवर आलो होतो," असं ते म्हणाले.
"मताचं राजकारण बाजूला ठेऊन हिंदुत्वाच्या बाजूने जे येतील त्यांना सोबत घेऊ असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केलं. हिंदुत्व कधीच मारक ठरत नाही. हिंदुत्व हे यशाकडेच जातं, निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळेल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली," ते म्हणाले.
"हिंदू एकत्र यावेत ही आमची भूमिका आहे. भाजप हिंदुत्ववादी पक्ष असेल आणि प्रचारासाठी हा मुद्दा घेणार असेल तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ," असं संकेतही जोशी यांनी दिले.

दुपारी 1.30 वाजता - फैजाबादमध्ये लँडिंग
मुंबईहून निघालेल्या ठाकरे कुटुंब विमानाने फैजाबादमध्ये पोहोचले. त्यांच्या गाड्यांचा ताफा आता अयोध्येच्या दिशेने निघाला आहे.

दुपारी 1 वाजता - अयोध्येला छावणीचं स्वरूप
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्काराला पाचारण करण्याची मागणी ANIने दिले आहेत.
सध्या अतिरिक्त महासंचालक स्तराचे एक अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 काँन्स्टेबल, पीएसीच्या 42 तसंच आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ATSचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मागास वर्ग कल्याण मंत्री ओम प्रकाश राजभर म्हणाले, "अखिलेश यादव यांचं वक्तव्य स्वागतार्ह आहे. आम्ही अयोध्येत 144 कलम लागू केली असतानासुद्धा शासन लोकांना तिथे गोळा होऊ देत आहे. म्हणजे ते निष्प्रभ ठरले आहेत. म्हणून लष्कराला पाचारण करण्यात यावं."
"काहीही गडबड झाली तर जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल. पण त्यांना याची चिंता नाही. ते निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत," असं ते म्हणाले.

सकाळी 11.36 वाजता - मायावतींची भाजप, सेनेवर टीका
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सरकार आणि शिवसेनेलाही धारेवर धरलं.
"भाजपला सत्तेत जवळजवळ पाच वर्षं पूर्ण होत आली आहे, पण या मोदी सरकारने 50 टक्के आश्वासनंही पूर्ण केली नाहीत. पंतप्रधान आणि भाजपला हे माहिती आहे, म्हणून त्यांना विश्वास नाही की ते पुन्हा सत्तेत येतील," असं मायावती म्हणाल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
"आपल्या अपयशाला बगल देण्यासाठी त्यांनी पुन्हा हा राम मंदिर मुद्दा उचलून धरला आहे. त्यांची इच्छा असती तर पाच वर्षं वाट का पाहिली असती त्यांनी? हे त्यांचं राजकारण आहे आणि काही नाही. शिवसेना आणि बाकी सगळेही त्याचाच भाग आहेत," असं त्या पुढे म्हणाल्या.

सकाळी 10.30 वाजता - ठाकरे कुटुंब विमानतळाकडे रवाना
उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबई विमानतळाकडे रवाना झाल्याची बातमी ABPमाझाने दिली आहे.

सकाळी 10.00 वाजता - अयोध्येत जय्यत तयारी
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
फैजाबाद ते अयोध्या या रस्त्यावर जागोजागी उद्धव ठाकरे यांचे मोठमोठे पोस्टर लागले आहेत. हजारो शिवसैनिकही अयोध्येत दाखल झाले आहेत. पण याच काळात विश्व हिंदू परिषदेने धर्म संसदेचं आयोजन केलं असून त्याचेही पोस्टर सर्वत्र दिसत आहेत, अशी माहिती बीबीसी मराठी प्रतिनिधी निरंजन छानवाल यांनी दिली.

शरयू नदीच्या तीरावर 'हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार'च्या घोषणा देत आहेत, अस वृत्त शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना'ने दिलं आहे.

अयोध्येत लष्कर बोलवा : अखिलेश यादव
अयोध्येतील परिस्थिती लक्षात घेता, तिथं लष्कराला पाचारण करावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. ते म्हणाले, " भारतीय जनता पक्षाचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. उत्तर प्रदेश आणि विशेषतः अयोध्येतील वातावरण लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन आवश्यक असेल तर लष्कर पाठवावे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6

सुरक्षेचा फौजफाटा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. याच काळात विश्व हिंदू परिषदेने धर्म संसदेचं आयोजन केलं आहे. दोन्ही कार्यक्रम एकाचवेळी होणार असल्याने वातावरण संवेदनशील झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामजन्मभूमीला सुरक्षेचा वेढा आहे. त्यात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची भर पडली आहे. त्यामुळे अयोध्या शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
अतिरिक्त महासंचालक स्तराचे एक अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 काँन्स्टेबल, पीएसीच्या 42 तसंच आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)