स्पायडरमॅन आणि हल्कचे जनक स्टेन ली यांचं निधन

स्टेन ली, कॉमिक्स, स्पायडरमॅन, अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टेन ली

कॉमिक्सविश्वात स्वत:ची छाप उमटवणारे, मार्वल कॉमिक्सचे संपादक आणि स्पायडरमॅन, हल्क अशा पात्रांचे निर्मितीकार स्टेन ली यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.

ली यांच्या पत्नी जोन यांचं गेल्या वर्षी निधन झाले होतं. ली यांच्या पश्चात मुलगी आहे.

ली यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना लॉस एंजेलिसमधील सीडर्स मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

कॉमिक्स लेखक असलेले स्टेन ली यांनी चित्रपट निर्माता, अभिनेता, प्रकाशक अशा विविधांगी भूमिका कारकीर्दीत समर्थपणे पेलल्या.

1961 मध्ये द फॅन्टास्टिक फोर हे सुपर हिरो असलेलं कुटुंब ली यांची निर्मिती. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. स्पायडरमॅन, हल्क, एक्स मॅन, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँट मॅन हे सुपरहिरो त्यांनी तयार केले.

रविवारी, त्यांच्या फेसबुक पेजवर एका फोटो प्रसिद्ध करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्लेराइट नावाने कार्यरत ली यांचा तो फोटो होता.

कोण होते ली?

रोमानियाहून आलेल्या ज्यू स्थलांतरित दांपत्याचा ली हा मुलगा. टाइमली पब्लिकेशन्सच्या कॉमिक्स सेक्शनमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. याचंच पुढे मार्वल कॉमिक्स असं रुपांतर झालं.

साधारण चार वर्षं ली यांनी गुन्हे, रहस्य यांच्या अंगानं तरुण वर्गाला लक्ष्य ठेऊन कॉमिक्स कथा लिहिल्या.

चाळीसाव्या वर्षी त्यांनी कॉमिक्सला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मात्र पत्नी जोन यांनी ली यांना कॉमिक्स पात्रांची निर्मिती करण्याचं सुचवलं.

1961मध्ये जॅक किर्बी आणि ली यांनी संयुक्तपणे फॅन्टास्टिक फोरची निर्मिती केली.

ली यांची निर्मिती असलेला ब्लॅक पँथर हा अमेरिकेच्या कॉमिक्सविश्वातला पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो होता.

आपल्या कलाकारांना त्यांचं श्रेय देण्यासाठी ली ओळखले जात असत.

ली यांच्या कार्यकाळात एका वर्षात मार्वलच्या 50 दशलक्ष प्रती विकल्या जात असत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)