'तुम्ही गाढवाची पूजा करणार की हत्तीची?' जाहिरातीसाठी गणपतीचा वापर केल्याने अमेरिकेत वाद

गणपती जाहिरात

अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या एका जाहिरातीमुळे हिंदुंची माफी मागावी लागली.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही जाहिरात करण्यात आली होती.

'तुम्ही गाढवाची पूजा करणार की हत्तीची? निवड तुम्हाला करायची आहे,' असा राजकीय मेसेज या जाहिरातीसोबत देण्यात आला होता.

USमध्ये गाढव हे डेमोक्रेटिक पक्षाचं तर हत्ती हे रिपब्लिकन पक्षाचं राजकीय चिन्ह आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या टेक्सासमधील फोर्ट बेंड काउंटी शाखेनं ही जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात दिली.

या जाहिरातीवर टीकेची झोड उठल्यानंतर पक्षानं या शाखेकडून खुलासा मागितला होता.

"रिपब्लिकन पक्षाच्या टेक्सास इथल्या शाखेनं हिंदू सणानिमित्तानं हिंदू मतदारांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न आम्ही समजू शकतो. पण जाहिरातीत गणपतीची तुलना राजकीय पक्षांशी संबंधित प्राण्यांशी करणं आक्षेपार्ह आहे," असं Hindu American Foundationचे सदस्य ऋषी भुतडा यांनी निवेदनात म्हटलं आहे.

अनेकांनी या जाहिरातीवर टीका केली आणि ती मागे घ्यायला लावली.

पक्षानं मागितली माफी

हिंदू रीतिरिवाज किंवा परंपरा यांचा अपमान करणं हा या जाहिराती मागचा उद्देश नव्हता, असं पक्षानं म्हटलं आहे.

"या जाहिरातीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. कोणाला दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता," असं रिपब्लिकन पक्षाच्या टेक्सासमधील फोर्ट बेंड काउंटी शाखेचे अध्यक्ष जेसी जेटन यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पक्षानं माफी मागितल्यानंतर Hindu American Foundationनं ती स्वीकारली आहे.

"हिंदू समाजात पक्षाचा प्रचार करताना भविष्यात अशी चूक होऊ नये यासाठी काय योजना आखणार, हाच मोठा प्रश्न आहे," असं भुतडा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)