कुत्रीवर हृदय शस्त्रक्रिया : वृद्ध दांपत्याने केले 11 लाख खर्च

फोटो स्रोत, ROYAL VETERINARY COLLEGE
अनेकांचं त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम असतं. मालक कुत्र्यांवर बराच खर्चही करतात. पण हा खर्च किती असेल? लंडनमधील एका कुटुंबाने त्यांच्या कुत्रीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी तब्बल 12 हजार पाऊंड म्हणजे जवळपास 11 लाख रुपये खर्च केले आहेत. तिच्यावर दुहेरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असून अशी शस्त्रक्रिया कुत्र्यावर केली जाण्याची पाहिलीच वेळ आहे.
हे कुटुंब यूकेमधील चेशायर इथं राहतं. पॉल (64) आणि पॉलिन डेले (59) असं या जोडप्याचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसासाठी जपून ठेवलेले पैसे या शस्त्रक्रियेसाठी वापरले. लोटी असं या कुत्रीचं नाव आहे. ही लॅब्रेडॉर प्रजातीची कुत्री 11 महिन्यांची आहे.
रॉयल व्हेटेरिनरी कॉलेजमध्ये 30 जुलैला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या या कुत्रीची प्रकृती सुधारत आहे. या कुत्रीला झालेला हा आजार दुर्मीळ प्रकारातील होता. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या डॉक्टरांनी काही बालरोग तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन घेतलं होतं.
पॉलिन म्हणाल्या, "शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आम्हाला आनंद झालं आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही ट्रिपवर जाणार नाही. पण लोटी आता सुटीवर जाऊ शकेल."

फोटो स्रोत, PAULINE DALEY
"लोटीने कधीही जीव सोडला असता. तिची अवस्था एखाद्या टाइम बाँबसारखी आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं."
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 4 तास लागले.
प्रा. डॅन ब्रोकमॅन आणि 10 डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








