कमी काम करणं महत्त्वाचं आहे, कारण...

काम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अॅमँडा रुग्गेरी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वॉशिंग्टनहून मी रोमला राहायला गेले तेव्हा प्राचीन काळातले खांब किंवा भव्यदिव्य दिवाणखाने वगैरेवगैरे गोष्टी तर मला दिसल्याच, पण त्याहीपेक्षा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की, इथले लोक काहीही करत नाहीत.

बऱ्याचदा काही म्हाताऱ्या आजीबाई खिडक्यांतून बाहेर डोकावून खाली वावरणारी लोक पाहात आहेत, हे दृश्य मला ओझरतं दिसायचं. किंवा मग दिसायचं की, संध्याकाळी काही कुटुंब रपेटीला बाहेर पडली आहेत.

त्या कुटुंबांतले सदस्य रस्त्यात भेटलेल्या जणू प्रत्येकाला किंवा मग किमान त्यांच्या ओळखीच्या लोकांना अभिवादन करत आहेत.

अगदी ऑफिसमधलं जगही यापेक्षा फारसं वेगळं नाहीये. धावतपळत ऑफिसला पोहचणं आणि काम करणं ही गोष्ट तर चार हात लांबच आहे.

उलट ऑफिसच्या डेस्कवर सॅण्डविचची डिश ठेवलेली दिसते. लंचटाईमच्या सुमारास ऑफिसेसजवळची रेस्तराँ कर्मचाऱ्यांनी ठासून भरलेली असतात. जो तो भरपेट जेवणावर ताव मारत असतो.

अर्थातच सतराव्या शतकातल्या पर्यटकांनी लिहून ठेवलेल्या आठवणींच्या नोंदी धुंडाळल्या तर आपल्याला दिसेल की, इटालियन 'indolence' आळसाबद्दल इतर लोकांच्या काही साचेबंद अशा कल्पना होत्या.

याच जातकुळीतल्या पर्यटकांनी पुढं केलेल्या नोंदींनुसार रमतगमत केलेल्या लंचनंतर इथली लोक जवळपास रात्री 8 पर्यंत ऑफिसात मन लावून काम करतात आणि नंतर स्कूटरनं घरी परतात.

अगदी असं सगळं असलं तरी भरपूर काम करणं आणि il dolce far niente आणि the sweetness of doing nothing अर्थात काहीही न करण्यातली गोडी अनुभवणं या दोन्ही गोष्टींचा समतोल राखायला हवा, असा विश्वास मला वाटतो.

कारण शेवटी काहीही न करणं ही गोष्ट उपयुक्त गोष्ट करणं या गोष्टीची अगदी विरुद्ध गोष्ट आहे. आणि उपयुक्त गोष्ट मग ती सर्जनशील असो किंवा मग बौद्धिक किंवा औद्योगिक स्तरावरची असो या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपला वेळ खर्ची करत असतो.

पण आपल्याला अनेकदा असं वाटत राहातं की आपण सतत काही ना काहीतरी 'करत' असतोच. आपल्यापैकी अनेकांच्या असं लक्षात येतं की, हे असं सतत काहीतरी करत राहाण्यानं आणि अर्थात त्या करण्याचा उदो उदो करत राहाण्यानं आपण आपली कार्यक्षमता गमावून बसतो. जणू आपणच आपले वैरी होतो.

आराम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युरोपियन युनियनमधल्या प्रत्येक देशात चार आठवड्यांची पगारी रजा असते आणि दहा सार्वजनिक सुट्ट्या असतात.

संशोधकांना आढळलं की, याचा अर्थ असा नव्हे की दिवसातले 14 तास काम केल्यावर आपली कार्यक्षमता आपण प्रसन्नचित्त असताना जितकी चांगली राहाते तितकी राहात नाही किंवा तिचा स्तर घसरतो.

संशोधकांच्या या आकृतीबंधावरून हेही कळलं की, अशा प्रकारे काम करत राहाण्यानं आपली सर्जनशीलता आणि आकलनशक्ती हळूहळू क्षीण होत जाते.

ओव्हरटाईम अर्थात नेहमीच्या वेळेपेक्षा कामासाठी खर्च केलेल्या जादा वेळामुळं आपण केवळ शारीरिकदृष्ट्या आजारी पडतो असं नाही तर आणि अगदी उपरोधिकपणंही बोलायचं झालं तरी आपल्यापुढे काहीएक ठाशीव हेतूच मुळी उरत नाही.

`टू ऑसम अवर्स` या पुस्तकाचे लेखक जोश डेव्हिस यांच्या मतानुसार बौद्धिक काम हे जणू 10, 000 पुशअप (दंड) काढण्यासारखं आहे. शक्य तितक्या कार्यक्षमपणे आणि मध्ये ब्रेक न घेता सलग काम केलं जातं.

ऑडिओ कॅप्शन, बोर्ड परीक्षा निकालांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट भाग 32

आपल्याला उपजत प्रेरणेनं हेही कळत असतं की ही गोष्ट करणं तसं अशक्य आहे. त्याऐवजी आपण थोडंसं काम काही वेळ केलं आणि त्यानंतर दुसरं काम (अॅक्टिव्हिटी) केलं तर आपल्यावर येणारा अनावश्यक ताण काही आठवडे लांबेल. 10,000 दंड काढणं ही गोष्ट अधिक व्यवहार्य ठरेल.

डेव्हिस लिहितात की, "या दृष्टीनं विचार केला तर आपला मेंदू हाही एखाद्या स्नायूसमान आहे. सतत कामाचाच विचार आणि अशीच परिस्थिती राहिली तर काम पूर्ण करणं शक्य होणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे काम करण्याजोगी परिस्थिती निर्माण करायला हवी आणि कदाचित थोड्याबहुत प्रमाणात आपण ती करत नाहीयेत."

करा अथवा मरा

आपल्यापैकी अनेकजण मेंदूचा स्नायू म्हणून विचार करत नाहीत तर चक्क कॉम्युटर म्हणून विचार करतात. यात काही खोटं नाही, शिवाय काहीजण तर स्वतःला कामात इतकं झोकून देतात की, पुरेशी विश्रांतीही घेत नाहीत. काही तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट हानीकारक ठरू शकते.

'ऑटोपायलट' या पुस्तकाचे लेखक संशोधक शास्त्रज्ञ अॅण्ड्र्यू स्मार्ट म्हणतात की, "एखादं काम करताना अनिश्चित काळापर्यंत त्याचा ताण खेचून धरत आपलं ध्येय साध्य करू पाहाणं ही गोष्ट फारच चुकीची आहे. हे स्वतःचाच पराभव केल्यागत वागणं आहे."

"तुम्ही स्वतःला त्याच त्या कामाच्या विचारांत, आकलनांत सतत गुंतवून ठेवलंत तर जणू त्या विचारांचं कर्ज वाढतच राहिल. आपल्या शरीराला काही काळाची विश्रांती हवी आहे, ही गोष्टही तुम्हांला जाणवेल, पण आपण स्वतःला त्या कामात गुंतवून ठेवू.

मग त्या कामाची जणू एवढी सवय होऊन जाईल की, त्यावेळी येणारा तीव्र स्वरुपाचा ताण जाणवणं हळूहळू कमी होत जाईल. हे असं कालांतरानं होणं ही गोष्ट फारच धोकादायक आहे."

आराम

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, स्वीडनने नुकताच सहा तासांचा कामाचा दिवस करण्याचा प्रयोग केला. त्यांच्या लक्षात आलं की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली आहे.

एका पाहाणीनुसार दीर्घकाळ काम करण्यानं हृदयविकाराचा धोका 40 टक्के असतो, जवळपास तितकाच म्हणजे 50 टक्के धोका धुम्रपानामुळे असतो.

आणखी एका पाहणीनुसार खूप तास काम केल्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याचा धोका संभवतो. सात ते आठ वाजेपर्यंत काम करणाऱ्यांपेक्षा दिवसभरात 11 तासांहून अधिक काम करणाऱ्या लोकांना अडीच पट अधिक काळ औदासिन्य वाटतं.

जपानमध्ये एक अस्वस्थ करण्याजोगा ट्रेण्ड उसळी घेऊ पाहातो आहे, तो म्हणजे karoshi अर्थात death by overwork - अतिकाम केल्यानं मृत्यू येणं.

आता हे सगळं वाचल्यावर तुम्ही विचार करत असाल की, आपल्याला एखादी लांबलचक सुट्टी घ्यायला उशीर झालाय का? तर हो तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आहात.

हेलसिंकीमध्ये एका अभ्यासानुसार ज्या 26 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मोठ्या पदांवरचे अधिकारी किंवा उद्योजकांना फारच कमी वेळा सुट्टी घेतली होती, त्यांना आयुष्याच्या मध्यावरच मृत्यूनं गाठलं किंवा ते जगले, पण त्यांना दीर्घकालीन आजारपण जडलं.

सुट्टीचा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर खरोखरच स्वतःला बक्षीस द्या.

एका अभ्यासानुसार ज्या 5000 अमेरिकन कर्मचाऱ्यांनी वर्षभरात 10 पेक्षा कमी भरपगारी रजा घेतल्या त्यांना तीन वर्षांत जवळपास तीनदा पगारात वाढ आणि बोनस मिळाला आणि ज्या लोकांनी 10 पेक्षा जास्त दिवस रजा घेतली त्यांचं काय? त्यांना तीनपैकी दोन संधी मिळाल्या.

उत्पादनक्षमतेचं मूळ आणि कुळ

कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता हे सध्याचं नवीन खूळ किंवा पछाडलेपण आहे. पण तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल याविषयी असहमत आहेत.

1932मध्ये रसेल यांनी लिहिलं आहे की, "थोडीशी विश्रांती किंवा फावला वेळ घालवणं हे सुखदायी असतं, पण फक्त चोवीस तासांच्या दिवसात 4 तास काम करून भागेल का, असा सवाल ते करतात.

एके काळी ही गोष्टदेखील ठीकच होती. पूर्वी हसतखेळत काम करण्याची पद्धत प्रचलित होती, मात्र एकापरीनं तो उत्पादनक्षमतेतला एक अडथळाच होता.

आधुनिक काळातली माणसं विचार करतात की, कशासाठी आणि काहीतरी गोष्टीसाठी काम व्हायलाच पाहिजेत आणि मुख्य म्हणजे या `काहीतरी` किंवा `कशासाठी`मध्ये स्वतःचा विचार कधीच केला जात नाही."

असं म्हटलं जातं की, जास्तीतजास्त सर्जनशील आणि उत्पादनक्षम लोकांनाच खरंतर काम कमी करण्याचं महत्त्व जास्त माहिती असतं.

त्यांची कामकाजाविषयीची काहीएक तत्त्वं ठरलेली असतात. पण त्याचवेळी ते त्यांचं काम अतिशय समर्पित वृत्तीनं करतात आणि मग आराम करतात, फावला वेळ सत्कारणी लावतात.

'11 कमांडमेंटस् ऑन रायटिंग' या पुस्तकाचे लेखक हेन्री मिल्लर यांच्या मते "एका वेळी एकाच कामावर ते पूर्ण संपेपर्यंत लक्ष केंद्रित करायला हवं. अधिकच्या वेळामागं धावणं थांबावं. माणसासारखं वागावं. लोकांना भेटावं, चार ठिकाणं फिरावं, वाटलंच अगदी तर आवडेल ते खावं-प्यावं."

यूएसचे संस्थापक बेंजामिन फ्रँकलिन हे प्रचंड व्यासंगी आणि उद्योगी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या गुणांचं वर्णन करणाऱ्या कितीतरी कात्रणांमधून त्यांचं दैवतासमान ठरणारं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. ते रोज दोन तासांचा लंचब्रेक घेत. संध्याकाळचा वेळ मोकळा ठेवत आणि रात्रभर निवांत झोपत.

आराम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका अभ्यासानुसार ज्या उद्योजकांनी फारच कमी वेळा सुट्टी घेतली होती, त्यांना आयुष्याच्या मध्यावरच मृत्यूनं गाठलं किंवा ते जगले पण त्यांना दीर्घकालीन आजारपण जडलं.

रात्रंदिवस काहीतरी कशीतरी कामं करत बसण्यापेक्षा ते स्वतःचा वेळ, आपले छंद जोपासण्यात आणि समाजात मिळूनमिसळून राहाण्यात सार्थकी लावत.

डेव्हिस यांच्या मतानुसार, "खरंतर सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या नेतृत्व करण्याच्या भूमिकेची सावली दूर सारत आणि इतर चार चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःचा जीव रमवत. उदाहरणार्थ- त्यांनी फ्रँकलिन स्टोव्ह आणि विद्युत खांब यांचा शोध लावला."

जागतिक स्तरावर देशातली उत्पादनक्षमता आणि सरासरी कामाचे तास या गृहितकाचा अंदाज घेतला तरीही त्यांचा परस्परसंबंध स्पष्टपणे उलगडलेला दिसत नाही.

आठवड्यातील 38.6 कामाचे तास धरल्याचं उदाहरण घेतलं तरी नॉर्वेजियन कर्मचाऱ्यापेक्षा अमेरिकेतला कर्मचारी आठवड्याला 4.6 तासाहून अधिक काळ काम करतो. पण जीडीपीकडे लक्ष दिल्यावर दिसतं की, नॉर्वेमधील कर्मचाऱ्याला ताशी ७८.७० डॉलर्स मिळतात आणि अमेरिकेतील कर्मचाऱ्याला 69.60 डॉलर्स मिळतात.

इटलीचा विचार केला की, जिथं il dolce far niente अर्थात काहीही न करणं हेही कामच असतं, तिथं सरासरी आठवडाभरात 35.5 तास काम केलं जातं. तुर्कीमध्ये आठवडाभर सरासरी 47.9 तास काम केलं जातं. अगदी यूकेमधले लोकही 36.5 तास काम करतात.

शेवटी कॉफीसाठी काहीपण असं म्हटलं जातंच, कॉफी ब्रेक्स दिसतात तितके वाईट नाहीत.

नामी युक्ती

आपल्याला आठ तास काम करावं लागतं, कारण कंपन्यांना आढळून आलं की, अधिक कामाचे तास निर्दयपणं लादले तर त्याचा त्यांच्या उत्पादनक्षमतेवर विपरित परिणाम होतो.

औद्योगिक क्रांतीच्या काळात 10 ते 16 तास काम करणं ही गोष्ट सर्वसामान्य होती. दिवसातले आठ तास कामाचे हा प्रयोग करणारी फोर्ड ही पहिली कंपनी होती आणि त्यांना कर्मचाऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत बदल जाणवला, अगदी दर तासाला नाही तरी एकूणच क्षमतेत वाढ झाली. अवघ्या दोन वर्षांत त्यांनी दुप्पट नफा कमावला.

दिवसात दहा तासांपेक्षा आठ तास काम करणं अधिक चांगलं अशी गोष्ट असेल तर मग त्याहूनही कमी काळ काम करणं ही गोष्टी आणखी चांगली आहे का? कदाचित असूही शकेल.

आराम

फोटो स्रोत, Getty Images

चाळीशीवर वयोमान असणाऱ्या लोकांवरील एका संशोधनात आढळून आलं की, आठवड्यातले 25 तास काम करणं ही आकलनाच्या दृष्टीनं विचार करता उत्तम गोष्ट आहे.

त्याच संबंधात स्वीडनमध्ये केल्या गेलेल्या एका प्रयोगात आठवड्यात सहा तास काम केलं गेलं आणि त्यात कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि उत्पादनक्षमता या दोन्ही गोष्टींचा तोल अधिक चांगल्या प्रकारे राखला गेला.

वरकरणी पाहाता चांगल्या वाटणाऱ्या या गोष्टीतही लोक आपल्या कौशल्याचा कसा उपयोग करतात आणि कामाचा दिवस कसा घालवतात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

एका सर्वेक्षणानुसार यूकेमधील जवळपास 2000 पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता आठवड्यात जवळपास दोन तास 53 मिनिटं होती. त्याखेरीजचा उरलेला वेळ कर्मचारी समाजमाध्यमं हाताळणं, बातम्या वाचणं, सहकाऱ्यांसोबत कामाखेरीजचे चॅट, खाणं-पिणं आणि अगदी नवीन नोकरीचा शोध घेणं अशी तमाम कामं करतात.

आपण कितीही थोडं काळ काम केलं तरी त्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला हवं आणि कामाचा अतिताण न घेता आपल्या क्षमतेनुसारच ते करायला हवं.

स्टॉकहोम युनिर्व्हसिटीमधील मानसशास्त्रज्ञ के अॅण्ड्रे एरिकसन यांच्यासारख्या संशोधकांच्या निदर्शनास आलं की, काम कसं करावं याचा मुद्दाम सराव करतानाही त्यासाठी काही प्रावीण्य आणि कौशल्य आत्मसात करावी लागली. अधिकाधिक ब्रेक्स (विश्रांतीचा वेळ) कसे घेता येतील याचा विचार करावा लागला.

जवळपास सगळ्या लोकांना जेमतेम तासभर विश्रांतीखेरीज काम करता आलं आणि त्यांच्यात महत्त्वाचे संगीतकार, लेखक, अँथेलिटस् यांचा समावेश होता. ही मंडळी फार नाही तर त्यांच्या कामांसाठी सलग पाच तासांहूनही कमी तास खर्च करतात.

एरिकसन लिहितात की, "या मान्यवरांनी त्यांची आणखी काही कौशल्य शेअर केली. ती म्हणजे ते कामाचा थकवा घालवण्यासाठी छोटीशी डुकली अधूमधून काढतात. एका अर्थी शरीर आणि बुद्धीला काम करून थकवा येतोच."

आणखीन एका अभ्यासानुसार थोड्या थोड्या वेळानं कामातून विश्रांती घेण्यामुळे सहभागींना त्यांच्या कामाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता आलं आणि त्यांची कार्यक्षमता वाढली. विश्रांती न घेता काम केलेल्यांचं काम मात्र कमी दर्जाचं झालं.

कार्यक्षम विश्रांती

पण 'विश्रांती' हाच शब्द दरवेळी जादूई शब्द ठरेल असंही काही नाही, असं काही संशोधकांचं मत दिसतं. आपण काहीही करत नाही, म्हणजे ती एकाअर्थी विश्रांतीच असते, असं ते म्हणतात.

आराम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तत्वज्ञ बर्ट्राड रसेल यांनी लिहिलं होतं की अमेरिकेला आरामाची गरज आहे, पण हे त्यांना माहीत नाही.

आपण याआधीही पाहिलं की, आपण काहीही करत नसतानाही आपला मेंदू अँक्टिव्ह असतो. याला डिफॉल्ट मोड नेटवर्क (DMN) म्हणतात. स्मृतींचा संग्रह आणि भविष्याची तरतूद करण्याच्या मेंदूच्या महत्त्वाच्या कामात याची मोठी भूमिका असते.

मेंदूच्या या भागात लोकांना बघणं, त्यांच्याविषयी विचार करणं, त्यांच्याविषयी नैतिकदृष्ट्या मतं तयार करणं किंवा त्यांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणं आदी घडामोडी सतत चालू असतात.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर हे नेटवर्क कधी बंद पडत नाही. स्वीच ऑफ होत नाही. आपण अनेकदा आठवायचा प्रयत्न करतो, नजिकच्या भविष्याविषयी अटकळी बांधू शकतो, सामाजिक परिणामांचे अर्थ समजून घेऊ शकतो, स्वतःविषयी जाणून घेऊ शकतो, नैतिक मूल्यांची चाड ठेवू शकतो किंवा इतरांशी सहानुभूतीनं वागू शकतो - या सगळ्या गोष्टी आणि क्रिया-प्रतिक्रियांनी आपण घडत असतो आणि हे केवळ कामाच्याच ठिकाणी घडतं असं नव्हे तर ते आयुष्यभर घडत असतं.

युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियाच्या ब्रेन अँण्ड क्रिएटिव्हिटी इन्सिट्यूटमधील मार्टी हेलन इम्मॉरडिनो यंग या मेंदूतज्ज्ञांच्या मते, "यामुळे मेंदू परिस्थितीचं महत्त्व ओळखायला शिकतो. काही गोष्टींचे अर्थ जाणायला लागतो.

काही वेळा काही गोष्टींमागचा अर्थाचं केवळ आकलन करून घेतो असं नव्हे तर त्यावर क्षणिक प्रतिक्रियाही देतो. अनेक प्रकारचं मानसिक आणि भावनिक गुंतागुंतीचं वर्तन आणि श्रद्धा यामुळे घडतात आणि बिघडतात."

आपल्या डोक्यात काही वेळा काही केल्या नवीन कल्पना शिजत नाहीत, काही गोष्टींची संगती लागत नाही. या सगळ्याचं मूळ, सर्जनशीलतेचं कूळ हे DMN असतं.

तिथली ट्यूब चटकन पेटली की मग आपण काही गोष्टींची सांगड घेलू शकतो. एरवी दोन टोकाच्या वाटणाऱ्या गोष्टींना एकजीव करू शकतो. नाविन्यपूर्ण कल्पना लढवू शकतो.

अनेकदा आहा म्हणावंसं वाटावेत असे क्षण याच जागी दडी मारून बसलेले असतात. जसं आर्किमिडीजचं झालं होतं. तसंच तुम्हांलाही अंघोळ करताना किंवा रमतगमत फिरताना एखादी चांगली कल्पना सुचते, तेव्हा जीवशास्त्राचे आभार मानायला अजिबात विसरू नका.

कदाचित या सगळ्यांत अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करताना तुम्ही वेळीच अंतर्मुख झाला नाहीत तर फार मोलाच्या क्षणांत सामावलेला आनंद गमावून बसाल.

इम्मॉरडिनो यंग यांच्या मते, "काही वेळा काही गोष्टी केवळ करायच्या म्हणून केल्या जातात. काही वेळा आपल्याला त्या करायची तितकीशी क्षमताही नसते. त्या करायच्या नादात आपलं करणं अगदीच वरवरचं होऊन जातं.

बेंजामिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी प्रयोग केले.

काही काळानं ती कृती हेतूशून्य भासते आणि जणू एखादी पोकळी निर्माण होते. इतका त्या गोष्टीचा आपल्याला अर्थही लागत नाही. आणि आपल्याला हे चांगलं माहिती आहे की, काही काळ काही निरर्थक गोष्टी सतत केल्या गेल्या तर ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगली गोष्ट ठरत नाही."

मनाच्या माकडचेष्टा

पण जे लोक ध्यान करत असतील त्यांना एक गोष्ट नक्कीच माहिती असेल की, काहीच न करणं हे आश्चर्य वाटेल पण खरंच कठीण गोष्ट आहे. आपल्यापैकी कितीजण आपल्या फोनविषयी निष्काळजी असतील?

उलट आपल्याला अगदी अस्वस्थ वाटू लागतं अशा वेळी. अगदीच सांगायचं तर स्वतःला काही इजा झाल्यापेक्षाही भयंकर अस्वस्थ वाटतं. ११ वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासानंतर संशोधकांना आढळलं की, सहभागींना काहीच करायचं नाहीये, असं म्हटल्यावर ती गोष्ट अगदी शिक्षेसारखी वाटली.

प्रसंगी त्यांना जणू शॉक दिला असता तरी चाललं असतं. हे एवढ्यावरच थांबलं नाही. तर त्यांना सहा ते 15 मिनिटं नुसतंच बसून राहायला सांगितलं गेलं.

चांगली गोष्ट अशी की, तुम्हाला कष्ट करून काहीही कमावायचं नव्हतं. विश्रांती ही गोष्ट महत्त्वाची आहे हे खरं आहे, पण गाढ विचार केला असता बारकाईनं याविषयी विचार केलात तर तुम्हाला या विषयाची कल्पना येईल.

आराम

फोटो स्रोत, Getty Images

खरंतर कोणत्याही गोष्टीचं कल्पनाचित्र रंगवताना किंवा एखाद्या कल्पनारम्य परिस्थितीच्या प्रसंगाचा विचार करताना उदाहरणार्थ - मित्रांसोबत एखाद्या प्रश्नावर चर्चा करणं, एखाद्या चांगल्या पुस्तकात रमून जाणं वगैरे गोष्टींची आपल्याला मदतच होते असं इम्मॉरडिनो यंग यांना वाटतं.

काहीतरी हेतू मनात ठेवून आपण गोष्ट केली तर DMNला व्यग्र ठेवू शकतो आणि अर्थातच तेव्हा आपण समाजमध्यमं हाताळत नसू, हेही कटाक्षानं पाहायला हवं.

ती म्हणते की, "एखाद्या सुंदर फोटोकडे तुम्ही पाहात आहात, तर ते डिअँक्टिव्ह आहे. पण तुम्हा तो फोटो पाहून एखादी गोष्टी पालुपदासारखी पुन्हापुन्हा आठवत असेल, तेव्हा घडलेली गोष्ट स्मरत असेल, तेव्हाचे संवाद मनात रुंजी घालत असतील तर तुम्ही या नेटवर्कवर चांगले अँक्टिव्ह आहात."

या सततच्या घडामोडींचे होणारे हानिकारक परिणाम फार काळ टिकत नाहीत. मोठी माणसं आणि मुलांना चार दिवस त्यांच्या साधनांशिवाय बाहेरगावी पाठवलं आणि त्यांचा परफॉरमन्स पाहिला.

तर त्यांची सर्जनशीलता आणि प्रश्नांची उकल करण्याची क्षमता यांत 50 टक्के वाढ दिसली. त्यांची सर्जनशीलता वाढल्यानं त्यांना आवडेल अशा चांगल्या ठिकाणी पाठवणं हे किती महत्त्वाचं होतं, हे लक्षात येतं.

आणखीन एका चांगल्या परिणामकारक पद्धतीनुसार बिघडलेल्या गोष्टी घडवण्याविषयीचं मनन करणं. आठवड्याभराच्या सरावानं ज्या विषयांचा कधीही विचारदेखील केला नव्हता, त्याविषयी बसल्या बैठकीत विचार करण्याचं कौशल्य बाणलं गेलं. त्यामुळे सर्जनशीलता, मूड, स्मृती आणि ध्येयवाद वाढीस लागला.

आराम

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, विणकामासारख्या गोष्टी मेंदूला आराम देऊ शकतात.

आणखीन एका पाहणीत 100 टक्के लक्ष एकवटण्याची गरज नव्हती. उदाहरणार्थ- विणकाम किंवा रेखाटन.

व्हर्जिनिया वुल्फ यांनी `रुम ऑफ वन्स ओन`मध्ये लिहिल्यानुसार 'चित्र काढणं हा सकाळची निरर्थक कामं लवकर संपवण्याचा आणि ते रिकामपण भरून काढण्याचा उद्योग आहे. हां, आता त्यात काही वेळा आपला आळशीपणा उमटतो, आपली स्वप्नं मध्येमध्ये लुडबुडतात पण खरी गोष्ट अनेकदा पाण्याच्या बुडबुड्यासारखी वर येतेच.'

टाईम आऊट

तुमच्या कामाच्या डेस्कपासून 15 मिनिटं लांब चाललात किंवा रात्रीच्या वेळी ईमेलचं लॉगिंग आऊट केलंत, तर आपल्या हातातून काहीतरी निसटून चाललंय की काय अशी भावना मनाला वेढून बसते. त्या भीतीपोटी हातातल्या क्षणांची पकड निसटू पाहाते. सगळ्या गोष्टी कोसळू लागतात, कोसळतील अशी भीती वाटू शकते.

हे असं सगळं वाटणं चुकीचं आहे असं कवयित्री, उद्योजक आणि लाईफ कोच जेन रॉबिनसन म्हणते.

ती म्हणते की, "इथं मला रुपक अलंकाराचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आम्ही उद्योग सुरू केला. त्यानंतर वर्षभरानं अशी परिस्थिती होती की आम्ही वीक ऑफ घ्यायचो किंवा कुणाला तरी कामासाठी नियुक्त करायचो. मात्र त्या कुणावर आमचा पूर्ण विश्वास नसायचा. असं वाटायचं की, 'The fire will go out' केव्हाही भडका उडेल आता."

"आम्ही त्या कुणावर तरी न ठेवलेला विश्वास हे जळते निखारे होते, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो तरीही ते निखारे आमच्या मनात धगधगत होतेच. ते फेकून देणं इष्ट होतं की, त्यांचा स्फोट व्हायला हवा होता?"

कसं आहे की, आपल्यासारख्या काहीजणांना वाटत असतं की, आपण सतत काहीतरी करतोय, त्यांच्यासाठी ही सोप्पी गोष्ट नसते. पण आणखीन काही करण्याच्या नादाला लागण्यापेक्षा किंवा तसा देखावा करण्यापेक्षा आपण करत आहोत त्या कामाचा ताण येऊ न देणं किंवा प्रसंगी कमी काम करणं हे केव्हाही चांगलं. हाच खरा कामाचा सिद्धांत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)