सावित्री नदी सारखी घटना इटलीमध्ये; पूल कोसळून 37 ठार

फोटो स्रोत, EPA
इटलीतील वायव्येकडील जन्वा शहरात पूल कोसळून 37 ठार झाले आहेत. जवळपास 90 मीटर इतक्या उंचीचा हा पूल होता. मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 15 जण गंभीर जखमी असल्याचं पोलिसांनी बीबीसीला सांगितलं.
इटलीचे वाहतूक मंत्री डॅनिलो टोनिनेली यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचं म्हटलं आहे.
इथल्या अॅडनक्रोनोस या वृत्तसंस्थेनं स्थानिक अँब्युलन्स सेवेच्या हवाल्यानं मृतांची संख्या मोठी असल्याचं म्हटलं आहे. हा पुलाला तोलणाऱ्या टॉवरपैकी एक टॉवर कोसळल्याने हा पूल मोठा भाग कोसळला. या परिसरात सध्या वादळी हवामान आहे.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
या दुर्घटनेत पुलाचा मोठा भाग कोसळला असून कोसळेला भाग हा रेल्वे मार्गावर पडला आहे. याबरोबर पुलावर वाहतूक करणारे ट्रक आणि इतर वाहनंही खाली कोसळली आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
हा पूल 1960मध्ये बांधण्यात आला असून पुलाचं नाव मोरांडी पूल असं आहे. पुलाचा कोसळेला भाग फार मोठा आहे. या परिसरात मोठा पाऊस सुरू असताना हा पूल कोसळला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून इटलीला मदत करण्याची तयारी दाखवली आहे.
पूल कसा पडला?
या परिसरात तुफानी पाऊस सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता पूलाचा हा भाग कोसळला. पूल पडताना पाहिलेले नागरिक पिएत्रो एम अलअसा म्हणाले, "पुलावर वीज पडताना मी पाहिलं. त्यानंतर पूल पडला." त्यांनी अनसा या वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. पूल पडत असताना त्यावर मोठी वाहतूक होती.

फोटो स्रोत, Reuters
ढिगाऱ्याखाली ट्रक आणि कार अडकल्या आहेत. शिवाय आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत. पूलाचा पडलेला हा भाग पोल्सेवेरा नदीवरून जातो.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)