स्मृती मंधाना : ट्वेन्टी-20मध्ये विक्रमी वेगवान अर्धशतकी खेळी

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या स्मृती मंधानाने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-20 स्पर्धेत फास्टेस्ट फिफ्टीचा रेकॉर्ड नावावर केला.
1. टाँटन इथे झालेल्या मॅचमध्ये, वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून खेळताना स्मृतीने केवळ 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
2. महिला क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-20 प्रकारात वेगवान अर्धशतकाचा विक्रम सोफी डेव्हाइनच्या नावावर आहे. .. सोफीनेही 18 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं होतं.
3. वेस्टर्न स्टॉर्म आणि लोबोर लाइटनिंग या संघांदरम्यान झालेला हा सामना पावसामुळे प्रत्येकी सहा ओव्हर्सचा करण्यात आला. वेस्टर्न स्टॉर्म संघाने स्मृतीच्या 19 चेंडूत 52 धावांच्या वेगवान खेळीच्या जोरावर 85 धावांची मजल मारली. स्मृतीने चौकार आणि 4 षटकारांसह आपली खेळी सजवली.

फोटो स्रोत, Getty Images
4. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या किया सुपर लीग ट्वेन्टी-20 स्पर्धेत खेळणारी स्मृती मन्धाना भारताची पहिलीच खेळाडू आहे.
5. स्मृती या स्पर्धेत वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून खेळते आहे. याआधी स्मृती ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत ब्रिस्बेन हिट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
6. गेल्या महिन्यात IPL स्पर्धेवेळी महिलांचा मैत्रीपूर्ण ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात आला. स्मृतीने या सामन्यात आयपीएल ट्रेलब्लेझर्स संघाचं नेतृत्व केलं होतं.
7. सांगलीच्या स्मृतीने पाच वर्षांपूर्वी भारतासाठी पदार्पण केलं. भारतासाठी खेळताना 42 ट्वेन्टी-20 सामन्यात 857 रन्स केल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








