थायलंड : उरलेल्या 5 जणांना गुहेतून बाहेर काढण्याची मोहीम लवकरच सुरू होणार

थायलंड

फोटो स्रोत, Getty Images

थाडलंडमधल्या गुहेत अकडलेल्या इतर पाच मुलांना वाचवण्यासाठीची मोहीम पुन्हा लवकरच सुरु होणार आहे.

थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांपैकी 4 मुलांना रविवारी बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे गुहेतून बाहेर काढलेल्या मुलांची संख्या 8 झाली आहे. गुहेमध्ये आता 4 मुलं आणि त्यांचे फूटबॉल प्रशिक्षक आहेत.

या मोहिमेतील एका सूत्राने बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांना ही माहिती दिली.

तसेच थायलंडच्या नेव्ही सीलने फेसबुकवर ही माहिती दिली आहे. गुहेतून बाहेर काढण्यात आलेल्या मुलांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना असं बाहेर काढत आहेत

या मुलांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान बीबीसी वेदरच्या टीमने या गुहेच्या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पाऊस आणि वादळामुळे सुरू असलेल्या मोहिमेत अडचणी येण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत या परिसरात मोठा पाऊस तर त्यानंतर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेली मोहीम अत्यंत खडतर आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर बचाव कार्यात जास्तच अडथळे येणार आहेत.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आज बाहेर काढण्यात आलेली मुलं थंडीनं गारठली आहेत. पण त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आलं आहे. उरलेल्या मुलांना आणि प्रशिक्षकाला मंगळवारी गुहेतून बाहेर काढण्याच नियोजन आहे.

गुहेपासून हेलिकॉप्टरने उड्डाण केल्याचा व्हीडिओ तिथल्या सरकारी वृत्तवाहिनीनं ट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

"बाहेर काढण्यात आलेल्या मुलांची प्रकृती उत्तम आहे. उर्वरित मुलांना काढण्यासाठी पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करण्यास 10 तास तयारी करावी लागणार आहे. या तयारीसाठी ही मोहीम थांबवण्यात आली आहे," असं मोहिमेचे प्रमुख आणि चिआंग राय प्रांताचे (याच प्रांतात ही गुहा आहे) गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न म्हणाले.

बाहेर काढलेल्या मुलांची नावं गुप्त

या मोहिमेत रविवारी गुहेतून चार मुलांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण या मुलांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत. जी मुलं अजूनही गुहेत अडकली आहेत, त्यांचे आईवडील आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. या मुलांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ही मुलं चिआंग राय हॉस्पिटलच्या 8व्या मजल्यावर ठेवण्यात आलं असून त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

या प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न म्हणाले, या मुलांची प्रकृती उत्तम असून त्यांना भूक लागली आहे. "या मुलांना फ्राईड राईस खायचा आहे. त्यांनी बेसिल स्टिर फ्राईड राईस मागितला आहे," असं ते म्हणाले.

थाई गुहा

फोटो स्रोत, Getty Images

या मोहिमेत 90 डायव्हर्स सहभागी झाले होते. यातील 40 थायलंडमधील तर 50 इतर देशांतून आले आहेत. आधी गुहेतील पुराचं पाणी ओसरेपर्यंत या मुलांना काही महिने गुहेतच राहावं लागणार आहे, असं बचावकार्य करणाऱ्या थायलंड लष्कराने सांगितलं होतं.

पण रविवारी, गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न म्हणाले की, "येत्या चार-पाच दिवसांमध्ये गुहेच्या परिसरातलं वातावरण आणि पाण्याचं प्रमाण बचावकार्याला अनुकूल असणार आहे. मुलांचं आरोग्यही त्या दृष्टीने योग्य आहे."

त्यानंतर काल ही बचावमोहीम सुरू झाली आणि चार मुलांना बाहेर काढण्यात आलं.

1. रविवारी दिवसभरात काय घडलं?

  • स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता मुलांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली.
  • स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पहिल्या मुलाला गुहेतून बाहेर काढण्यात आलं.
  • आजच्या मोहिमेत चार मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व मुलांना जवळच्या चाईंग राई या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुलांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं.
  • रात्री 9 वाजता मोहीम थांबवण्यात आली.
  • सोमवारी सकाळी मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असून उरलेली 8 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दरम्यान, त्याआधी अडकलेल्या मुलांनी आपल्या पालकांना पत्रं लिहून 'आम्ही सुरक्षित आहोत, डोंट वरी', असे संदेश दिले होते. वाचा त्यांची पत्रं इथे.

2. मुलं गुहेत गेलीच का?

11 ते 16 वयोगटातील एका फुटबॉल टीमची ही मुलं आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षकही आहेत.

23 जून रोजी, म्हणजे साधारण 16 दिवसांपूर्वी या सगळ्यांनी या गुहेत प्रवेश केला.

गुहेत अडकलेली मुलं

फोटो स्रोत, facebook/ekatol

त्यांच्या सायकली गुहेच्या प्रवेशाजवळ सापडल्या, मात्र तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. संपूर्ण टीम बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी 1 वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली.

ते नेमके आत का गेले, हे अजूनही कळू शकलेलं नाही. मात्र काही स्थानिक वृत्तपत्रांनुसार ही टीम आपला सराव संपवून या गुहेत एक सरप्राईज बर्थडे पार्टी करायला गेली होती. याच टीममधला एक सदस्य गेम, जो गुहेत गेला नाही, त्याने एका बातमीत सांगितलं की ते सगळे याआधीही तीन वेळा गुहेत जाऊन आले आहेत, पण ऐन पावसाळ्यात कधीच नाही. "आम्ही नेहमीच पूर्ण तयारीने जायचो. टॉर्च लाईट घेऊन, जेवण करून आणि सगळे फिट आहेत, याची काळजी घेऊन आत शिरायचो," असं तो म्हणाला.

माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेलो नाही. पण एकाचा वाढदिवस येणार होता, म्हणून कदाचित काही सरप्राईज तिथे प्लॅन होत असावं," असं गेम पुढे म्हणाला.

3. राजकुमारीची दंतकथा

या गुहेबद्दल अनेक दंतकथा आहेत. एका कथेनुसार या गुहेला "Tham Luang- khun num nang non" म्हणतात, म्हणजेच एका पर्वतावर झोपलेल्या बाईची गुहा, जिथून एका नदीचा उगम होतो.

ही गोष्ट अशी की, चिआंग रूंग (जे आज दक्षिण चीनमधलं जिंगहाँग आहे) या शहराची राजकुमारी एका घोडेस्वाराच्या प्रेमात पडली. त्यांचं लग्न झालं आणि ती गरोदर झाली. पण त्यांना जीवाचा धोका वाटू लागल्याने ते दोघेही दक्षिणेकडे पळून आले.

थायलंड लष्कर आणि स्थानिक लोकांनी पुढे येऊन बचावकार्यात हातभार लावला आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, थायलंड लष्कर आणि स्थानिक लोकांनी पुढे येऊन बचावकार्यात हातभार लावला आहे.

एका पर्वतीय क्षेत्रात पोहोचल्यावर तिच्या नवऱ्याने तिला काही काळ तिथेच आराम करण्यास सांगितलं. मी जेवणाची सोय करून येतो, असं तो म्हणाला. तेवढ्यात तिच्या वडिलांनी त्याला शोधलं आणि त्याला ठार केलं.

राजकुमारीनं त्याची खूप दिवस तिथेच वाट पाहिली. पण अनेक दिवस त्याचा काही पत्ता न लागल्याने ती निराश झाली आणि तिने स्वतःला एका हेअरपिनच्या मदतीने भोसकून संपवलं. तिच्या शरीराचं एका मोठ्या पर्वतात रूपांतर झालं आणि तिच्या रक्ताची नदी झाली, जिला आज नाम मे सई किंवा सई नदी म्हणून ओळखलं जातं.

4. मुलं गुहेत अडकली कशी?

थाम लुआंग गुहा 10,316 मीटर लांब असून ही थायलंडमधली चौथी सर्वांत मोठी गुहा आहे.

ही अख्खी टीम गुहेत शिरल्यानंतर धो-धो पाऊस सुरू झाला आणि आसपासच्या जंगलातून पावसाचं पाणी गुहेत शिरू लागलं. पण तोवर हे सगळे गुहेत इतके आतवर पोहोचले होते की त्यांना लक्षात आलं नाही. पाणी वाटेतल्या एका खोलगट भागात साचल्यानं त्यांचा परत येण्याचा मार्ग बंद झाला.

पत्रकारांना गुहेजवळची जागा रिकामी करण्यास सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पत्रकारांना गुहेजवळची जागा रिकामी करण्यास सांगितलं आहे.

ब्रिटिश केव्ह रेस्क्यू काउंसिलचे बिल व्हाईटहाऊस यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, बचावकार्य करणाऱ्या डायव्हर्सना पाणी साचलेल्या भागात आणि थोड्या कोरड्या भागात साधारण 1,500 मीटर फिरून जावं लागलं.

5. बचावकार्यात धोका काय?

ही गुहा खूप लांब आहे आणि आत पाणी शिरलेलं आहे. जिथे पाणी नाही, तिथे सर्व डाइव्हर्स तळ बनवून थांबले आहेत.

काही दिवसांपासून गुहेतील पाणी मोटरने बाहेर काढलं जात आहे, त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे, म्हणून मुलांना गुहेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गुहेतून 12.8 कोटी लीटर पाणी बाहेर काढलं आहे.

गुहेतले धोके

बीबीसीचे प्रतिनिधी जॉनथन हेड यांनी सांगितलं की, बचाव कामातील सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे या मुलांनी यापूर्वी कधीही डायव्हिंग केलेलं नाही. शिवाय या मुलांना डायव्हिंगची उपकरणं सोबत घेऊन पोहायचं आहे.

थायलंड

फोटो स्रोत, Getty Images

गुहेतील पाणी अतिशय थंड आहे. मुलांना काही तास याच पाण्यात पोहावं लागणार आहे. त्याचा मुलांना त्रास होऊ शकतो. इतका वेळ पाण्यात पोहावं लागल्यानं शरीर बधीर होऊ शकतं. तसंच मुलांना इन्फेक्शनही होऊ शकतं. या गुहेतील वटवाघुळासारखे पक्षी चावण्याचीही भीती आहे, अशी माहिती हेड यांनी दिली.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)