क्युबा विमान अपघात : ब्लॅक बॉक्स सापडला

फोटो स्रोत, Rueters
हवाना विमानतळाजवळ अपघात झालेल्या विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी क्युबाची राजधानी हवानाजवळ झालेल्या या विमान अपघातात 110 जण ठार झाले होते.
अपघातग्रस्त विमानाचा हा ब्लॅक बॉक्स चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि इतर ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे. वैमानिकाचं संभाषण ज्या उपकरणात रेकॉर्ड होतं त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात.
आता हा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला हे समजण्याची शक्यता वाढली आहे.
या अपघातातून तीन महिला बचावल्या आहेत पण त्यापैकी एकीची स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे. ती महिला भाजली आहे आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP
दुसरा ब्लॅक बॉक्स लवकरच सापडेल अशी आम्हाला आशा आहे असं क्युबाचे वाहतूक मंत्री आदेल जकिर्दो यांनी म्हटलं आहे. या अपघातामध्ये 110 जण ठार झाले आहेत त्यापैकी 11 जण विदेशी नागरिक होते असं वाहतूक मंत्र्यांनी सांगितलं.
किमान 40 वर्षं जुनं असलेल्या बोइंग 737चे अवशेष हवानाच्या दक्षिणेला एका शेतात अस्ताव्यस्त पडलेले आहेत.
हे विमान 1979 साली बनलं होतं. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या विमानाची तपासणी करण्यात आली होती.
गेल्या काही दशकांमध्ये घडलेल्या विमान दुर्घटनांपैकी ही सर्वांत भयानक दुर्घटना आहे. क्युबामध्ये दोन दिवसांचा शोक पाळण्यात आला.
ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळं महत्त्वपूर्ण माहिती हाती लागेल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजलं नाही.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








