इम्रान खान शंकराच्या अवतारात : पाकिस्तानच्या संसदेत 'तांडव'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शहजाद मलिक
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
पाकिस्तानी राजकारणी आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या शंकराच्या रुपातल्या एका पोस्टरमुळे पाकिस्तानात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. इम्रान खान हे तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे अध्यक्ष आहेत.
पाकिस्तानी संसदेमध्ये या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. संसदेच्या कामकाजा दरम्यान मुख्य विरोधी पक्ष पीपीपीचे सदस्य रमेश लाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी मुस्लीम लीग (नवाज)च्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर इमरान खान यांचा शंकराच्या रुपातला फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यावर पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी या प्रकरणी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) ला चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हिंदूंच्या धार्मिक भावना
इमरान खान यांना विरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी खरंतर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी रमेश लाल यांनी दिली आहे.
कुणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये, असं संविधानात स्पष्ट लिहिलं असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय.
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि सोशल मीडिया सेलचे लोक इतर धर्मियांच्या भावना दुखावण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फोटो स्रोत, AAMIR QURESHI/AFP/Getty Images
ज्या प्रकारे मुस्लीमांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई केली जाते त्याचप्रकारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांवर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पाकिस्तानचं सर्वोच्च न्यायालय हिंदू धार्मियांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होताना दिसत आहे.
पाकिस्तानच्या चकवाल भागातल्या कटासराज मंदिराच्या दुरवस्थेची सर्वोच्च न्यायालयानं स्वत: दखल घेतली होती. तसंच त्याच्या दुरुस्तीसाठी पावलं देखील उचलली होती.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









