पाहा व्ही़डिओ - रशिया : शॉपिंग सेंटरमध्ये आग, 64 जणांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - रशिया: चिमुकली मुलं खेळत होती तिथेच आग लागली

रशियाच्या सायबेरियामधल्या केमेरोफो शहरात एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 64 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक लोक बेपत्ता असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. त्यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंटर चेरी मॉलच्या चौथ्या मजल्यावरून ही आग सुरू झाली. जिथं एक एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्स आणि चित्रपटगृह आहे. आग लागली तेव्हा तिथं एक सिनेमा सुरू होता.

केमेरोफोचे डेप्युटी गर्व्हनर व्लामिदीर चेर्नोफ यांनी सांगितलं की, आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चित्रपटागृहाला लागून असलेल्या एका हॉलमधून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

चित्रपटगृहाच्या दोन हॉलचं छप्पर कोसळल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या दृष्यांमध्ये शॉपिंग सेंटरमधून धूर निघताना दिसत आहे. लोक खिडकीच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत, तसंच लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

केमेरोफो शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून 3540 किमी अंतरावर आहे. कोळसा उत्पादनासाठी हे शहर ओळखलं जातं.

शॉपिंग सेंटर

फोटो स्रोत, Russian Emergencies Ministry via REUTERS

2013मध्ये सुरू झालेलं हे शॉपिंग सेंटर अतिशय लोकप्रिय असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तिथं एक छोटंसं प्राणीसंग्रहालय सुद्धा आहे.

या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. प्रशासनानं या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)