सोशल : 'प्लॅस्टिकला पर्याय शोधला तरच त्यावरची बंदी योग्य'

फोटो स्रोत, Getty Images
प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या आणि प्लॅस्टिक वस्तूंचं उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. गुढीपाडव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली त्यांची यादी शुक्रवारी विधिमंडळात सादर केली जाईल. आतापर्यंत 15 मायक्रॉनपर्यंतच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी होती. आता सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी असेल. यामध्ये प्लॅस्टिकचे चमचे, प्लेट आणि अन्य कटलरीचा समावेश असेल. परिणामकारक
अंमलबजावणीसाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. छोट्या शहरांमध्ये दररोज कित्येक टन प्लॅस्टिक तयार होत असल्याने त्यावर सरसकट बंदीचा विचार राज्य सरकार करत होते.
या पार्श्वभूमीवर बीबीसीने वाचकांना विचारलं होतं की संपूर्ण प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणी आणि व्यवहार्यतेबाबत त्यांना काय वाटतं...
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. त्यातल्याच या काही प्रतिक्रिया.
श्रीकांत जुन्नरकर लिहितात, "त्याला (प्लॅस्टिक वापराला) तेवढाच स्वस्त पर्याय उपलब्ध व्हायला हवा. स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध केल्यास उपरोक्त बंदीचा फटका कोणालाच बसणार नाही."

फोटो स्रोत, Facebook
सविस्तर प्रतिक्रिया देताना सुदर्शन व्यवहारे म्हणतात, "प्लॅस्टिक इतका बहुउपयोगी पदार्थ माणसाला सापडला नाहीये. प्रश्न प्लॅस्टिक वापराचा किंवा बनवण्याचा नाही आहे. प्रश्न आहे तो त्याच्या पुनर्वापराचा, कचऱ्याच्या वर्गवारीचा आणि त्याच्या पुनर्वापराचा. कमीत कमी वापर, पुर्नवापर आणि पुनर्निमिती ही सिस्टीम अमलात आणण्यासाठी जरी राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती दाखवली तरी पुरे."

फोटो स्रोत, Facebook
अमोल रनावरे यांनी या बंदीचं स्वागत केलं आहे. "अगोदरच्या काळात प्लॅस्टिक नव्हतं. आताही ते नसलं तरी फारसा फरक पडणार नाही. ज्या ठिकाणी अपरिहार्य आहे त्या ठिकाणी वापरलं जावं. लोकांना (प्लॅस्टिकच) व्यसन लागलं आहे. त्यामुळे त्याची बंदी नको वाटेल पण पृथ्वीचं आरोग्य ठीक ठेवायचं असेल तर पर्याय नाही."

फोटो स्रोत, Facebook
दिगंबर चौधरी म्हणतात, "निर्णय चांगला आहे. जनतासुद्धा स्वीकारेल. पण जगण्याची एक मूलभूत गरज बनलेल्या प्लॅस्टिकला पर्याय शोधणं गरजेचं आहे."

फोटो स्रोत, Facebook
"प्लॅस्टिकपेक्षा थर्माकॉल जास्त घातक आहे त्याचं काय?" असा प्रश्न प्रसाद घळसासी यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Facebook
दामोदर बजाज यांनी तर कमेंट करणाऱ्यांनाही फटकारलं आहे. ते म्हणतात, "जितके लोक इथे कमेंट करत आहेत, त्यातले 50 टक्के प्लॅस्टिक वापरतात आणि इथे सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत."

फोटो स्रोत, Facebook
लोन गनमॅन या अकाऊंटवरून मात्र या निर्णायाचा विरोध केला आहे. "मी पूर्णपणे असहमत आहे. मी फुटवेअरचा व्यावसायिक आहे. माझ्याकडे 90 टक्के प्लॅस्टिकचा माल आहे. आम्ही काय करायचं? फुटकळ प्रतिक्रिया देऊ नका."
किशोर दुमाने यांनी ट्वीट केलं आहे की, "गुटखा बंदी झाली पण गुटखा मार्केटमध्ये मिळतोच ना?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सूरज काळे-देशमुख म्हणतात, "गरीब विक्रेत्यांवर कारवाई करण्याआधी प्लॅस्टिक बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
सोबतच ऐका प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान आणि त्यासंबंधित इतर गोष्टींबद्दल, BBC English Together.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)