मशिदी आणि मुस्लिमांवरच्या हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा

मशिदी आणि मुस्लिमांच्या उद्योगांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनंतर श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने आणीबाणीची घोषणा केली आहे.
कॅंडी शहराच्या काही भागात संचारबंदी लागू केली आहे. कँडीमधून मिळणाऱ्या माहितीनुसार बौद्ध सिंहली लोकांनी मुस्लिमांच्या दुकानांवर हल्ले केले आणि त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी पाडलं.
एका जळालेल्या इमारतीतून एका मुस्लीम व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर दुसरा गट सूड घेण्यास काही हालचाली करेल, अशी पोलिसांना भीती आहे.
आठवडाभरापूर्वी एका ट्रॅफिक सिग्नलवर झालेल्या भांडणानंतर काही मुस्लिमांनी एका बौद्ध तरुणाला मारहाण केली होती. तेव्हापासूनच या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या पूर्व भागातील अमपारा शहरात मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार झाला होता.

फोटो स्रोत, Google Maps
दरम्यान, एका क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत आहे. कँडीपासून जवळपास 120 किमी दूर राजधानी कोलंबोमध्ये बुधवारी एका टी-20 सामना खेळला गेला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"संघर्षाची स्थिती कँडीत असून भारतीय संघ कोलंबोत आहे. तिथली परिस्थिती सामान्य असल्याचं सुरक्षा सैन्याने सांगितलं आहे," असं BCCI ने म्हटल्याने ANI वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
जातीय हिंसाचाराचा इतिहास
श्रीलंकेत 2012 पासून जातीय तणावाची परिस्थिती आहे. एक कट्टरवादी बौद्ध संघटना या तणावाला प्रोत्साहन देत आहे, असं सांगण्यात येत आहे.
काही कट्टरतावादी बौद्ध संघटनांनी मुस्लिमांवर बळजबरी करण्याचा आणि बौद्ध मठांना नुकसान पोहोचवल्याचा आरोप लावला आहे.
मागच्या दोन महिन्यांच्या दरम्यान गॉल मध्ये मुस्लिमांच्या मालकीच्या कंपन्यांवर आणि मशिदींवर हल्ल्यांच्या जवळजवळ 20 घटना झाल्या आहेत.
2014 साली कट्टरतावादी बौद्धांच्या गटांनी तीन मुसलमानांचा खून केला होता, ज्यानंतर गॉलमध्ये दंगली भडकल्या होत्या. 2013 साली कोलंबोमध्ये बौद्ध गुरुंच्या नेतृत्वाखाली एका जमावाने एका दुकानावर हल्ला केला. हे दुकान एका मुस्लीम व्यक्तीच्या मालकीचं होतं. आणि या हल्ल्यात किमान सात जण जखमी झाले होते.

श्रीलंकेची लोकसंख्या दोन कोटी दहा लाखाच्या आसपास आहे आण त्यात 70 टक्के बौद्ध आणि 9 टक्के मुस्लीम आहेत.
2009 साली श्रीलंकेच्या सैन्याकडून तामीळ बंडखोरांचा पराभव झाल्यानंतर श्रीलंकेचा मुस्लीम समाज राजकीय हालचालींपासून दूरच आहे.
पण गेल्या काही वर्षांत मुस्लीम समुदायाच्या विरोधात, धर्माच्या नावावर हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारासाठी बौद्ध गुरुंना जबाबदार ठरवलं जात आहे.
बौद्धांच्या निशाण्यावर मुस्लीम का?
बौद्ध धर्माला जगात शांती आणि अहिंसेचं प्रतीक मानलं जातं. मग मुस्लिमांविरुद्ध त्यांना हिंसाचाराचा मार्ग का अवलंबवावा लागत आहे असाही प्रश्न उपस्थित होतो.
श्रीलंकेत मुस्लीम परंपरेनुसार मांसाहार किंवा पाळीव पशूंना मारणं हा बौद्ध समुदायासाठी एक वादाचा मुद्दा आहे.

फोटो स्रोत, Reuters
श्रीलंकामध्ये कट्टरवादी बौद्धांनी एक बोडू बला सेना तयार केली आहे. ही सेना म्हणजे सिंहली बौद्धाची राष्ट्रवादी संघटना आहे.
या संघटनेला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येची पण काळजी आहे. म्हणून ही संघटना मुस्लिमांविरुद्ध मोर्चा काढत असते, तसंच मुस्लिमांच्या उद्योगधंद्यावर बहिष्कार घालण्याची वकिली करते.
हेही वाचलंत का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








