'परिस्थिती नियंत्रणाबाहेर': सीरियात हवाई हल्ल्यात '250 लोकांचा बळी'
सीरियाच्या सैन्याने पूर्व घूटा भागावर केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा 250 वर पोहोचला आहे. त्यात 50 बालकांचा समावेश आहे. 2013 साली झालेल्या हल्ल्यानंतर झालेला हा सगळ्यांत भीषण हल्ला आहे.
सोमवार आणि मंगळवारच्या हल्ल्यांच्या केंद्रस्थानी सहा रुग्णालय होते, असं संयुक्त राष्ट्र महासंघाने सांगितलं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संयुक्त राष्ट्र महासंघाचे प्रवक्ते रियाल लेबलांक म्हणाले, "नागरिक, रुग्णालय आणि शाळांमध्ये सुरू असलेल्या सतत हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. हा माणुसकीवर कलंक आहे."
सीरिया सेनेनं खंडन केलं नाही
पूर्व गूटामधून येणाऱ्या वृत्तांवर सीरियाच्या लष्करानं काही बोलणं टाळलं असून, पण त्यांच्याविरुद्ध जिथे जिथे हल्ले झाले आहेत तिथे त्यांनी 'पद्धतशीर' हल्ले केल्याचं म्हटलं आहे.
अलेप्पो भागातील खासदार फारिस शहाबी यांनी बीबीसीला सांगितलं की सीरिया सरकार कट्टरवादी किंवा नागरिक, कोणावरही हल्ला केलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "आमचा सगळ्या कट्टरवाद्यांना पूर्व गूटा भागातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न आहे. दमास्कस भागात राहणारे लोक यात मारले जात आहेत. कारण पूर्व गूटा भागातून दमास्कस वर मॉर्टर हल्ले केले जात आहे. दमास्कसमध्ये मोर्टार बाँबस्फोट केले जात आहेत. दमास्कस भागात माझ्या ऑफिसच्या जवळ तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. पूर्व गूटा भागात दमास्कसच्या निवासी भागात 100 मॉर्टर्सचा वापर झाला आहे. पूर्व गूटा भागातल्या नागरिक हे आमचं लक्ष्य नाही."
पूर्व गूटा भागात सध्या काय होतंय?
राजधानी दमास्कस च्या जवळ पूर्व गूटा भागात बंडखोरांनी कब्जा केलेलं हे शेवटचं शहर आहे. रशिया समर्थन करणाऱ्या लोकांनी या क्षेत्राचा ताबा घेण्यासाठी रविवारपासून हल्ला वाढवला आहे.
2013 सालच्या रासायनिक हल्ल्यानंतर गेल्या 48 तासात सगळ्यांत जास्त मृत्यू झाले आहेत. या हल्ल्यात 1200 लोक जखमी झाले.

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी झालेल्या हल्ल्यात पूर्व गूटा भागात शहरं आणि गावांवर हल्ला झाला आहे.
संयुक्त राष्ट्र महासंघाने शस्त्रसंधीची मागणी केली असून जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
आफरिनमध्ये घुसलं लष्कर
दरम्यान, सीरियामध्ये सरकार समर्थकंनी कर्डचा गड असलेल्या आफरिनमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागात तुर्कस्तानच्या सैन्याच्या वतीने काही तरी कारवाई करण्याच्या शक्यता वाढल्या आहे.
कर्ड बंडखोरांनी सीरिया सरकारला मदतीची याचना केली होती, जेणेकरून तुर्कस्तानचं सैन्य आणि सीरियाच्या बंडखोरांकडून जे अभियान होतं त्याचा विरोध केला जाऊ शकेल.

फोटो स्रोत, AFP
सात वर्षांनंतरही सीरियामधलं युद्ध थांबण्याऐवजी फक्त बदलतंय, अशा शब्दांत 'बीबीसी'चे मध्य पूर्व आशियाचे संपादक जेरेमी बोवेन यांनी सीरियातील परिस्थितीचं विश्लेषण केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









