‘अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर 2018’चं विजेतं छायाचित्र

अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर 2018

फोटो स्रोत, TOBIAS FRIEDRICH/UPY 2018

फोटो कॅप्शन, अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर 2018.

जर्मन फोटोग्राफर टोबीअस फ्रेडरिक यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान बुडालेल्या जहाजावरील लष्करी वाहनांच काढलेलं छायाचित्र हे 'अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर 2018'चं विजेतं छायाचित्र ठरलं आहे.

इजिप्तमधल्या रस मोहम्मद किनाऱ्यालगत फ्रेडरिक यांनी हे छायाचित्र घेतलं होतं. जगभरातून 5000 छायाचित्रकारांनी पाठवलेल्या पाण्याखालील छायाचित्रांमधून त्यांच्या या छायाचित्राची निवड झाली आहे.

"काही वर्षांपूर्वी असं छायाचित्र घेण्याची कल्पना मला सुचली होती. पण एकाच छायाचित्रात संपूर्ण दृष्य सामावणं अशक्य आहे. कारण रॅकमध्ये अगदी थोडीशी जागा असल्यानं एकाच फ्रेममध्ये छायाचित्र घेता येत नाही. अनेक छायाचित्रं घ्यायची आणि ती एकत्र जोडून पॅनारोमा छायाचित्र तयार करायचं असा पर्याय मी त्यावर काढला," फ्रेडरिक म्हणाले.

स्पर्धेचे निरीक्षक पीटर रोलँड्स म्हणाले, "हा एक विलक्षण असा शॉट आहे. जो शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात बघितला पाहिजे. अशा छायाचित्रासाठी कलात्मक कौशल्य लागतं आणि त्यासाठी छायाचित्रणाची प्रतिभा प्राप्त असावी लागते."

ब्रिटीश अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर

फोटो स्रोत, GRANT THOMAS/UPY 2018

फोटो कॅप्शन, ब्रिटीश अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर.

ग्रँट थॉमस यांनी 'ब्रिटीश अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर' हा पुरस्कार पटकावला. स्कॉटलंडच्या लोश लोहमंड तलावात त्यांनी राजहंसाच्या जोड्याचं छायाचित्र घेतलं होतं.

लव्ह बर्ड्स असं टायटल त्याला देण्यात आलं. अनेक तास पाण्यात प्रतीक्षा करण्याचं फळ थॉमस यांना मिळालं. "राजहंस अन्नाचा शोध घेत होते. परफेक्ट क्षणसाठी मला फक्त संयमानं प्रतीक्षा करायची होती," अशी प्रतिक्रिया थॉमस यांनी दिला आहे.

वाम माशाच्या पार्श्वभूमीवर सी स्लगचं हे छायाचित्र अब्दुल रहमान जमालुद्दीन यांनी टीपलं आहे.

फोटो स्रोत, MANBD UIDIVE/UPY 2018

फोटो कॅप्शन, वाम माशाच्या पार्श्वभूमीवर सी स्लगचं हे छायाचित्र अब्दुल रहमान जमालुद्दीन यांनी टिपलं आहे.
लिसस्टर स्थित टॉनी स्पेफनसन यांनी एका लोकप्रिय स्कूबा डायव्हींग साइटमध्ये पाईक माशांना शोधण्यात यश मिळवलं.

फोटो स्रोत, TONY STEPHENSON/UPY 2018

फोटो कॅप्शन, लिसस्टरमधल्या टॉनी स्पेफनसन यांनी एका लोकप्रिय स्कूबा डायव्हींग साईटमध्ये पाईक माशांना शोधण्यात यश मिळवलं.
जेव्हा व्हेल मासा भक्ष्य शोधण्यासाठी पाण्याबाहेर येतांना उभा येतो. तेव्हाची त्याची ही स्थिती टिपली आहे ग्रेग लेकोउर यांनी.

फोटो स्रोत, GREG LECOEUR/UPY 2018

फोटो कॅप्शन, जेव्हा व्हेल मासा भक्ष्य शोधण्यासाठी पाण्याबाहेर येतांना उभा येतो. तेव्हाची त्याची ही स्थिती टिपली आहे ग्रेग लेकोउर यांनी.
शेन ग्रॉस यांनी सी हॉर्सचे हे छायाचित्र भरपूर प्लँक्टन असलेल्या एका तलावात घेतलं होतं. एकाचवेळी तीन सी हॉर्स कॅमेऱ्यात कैद करण्यात त्यांना यश आलं.

फोटो स्रोत, SHANE GROSS/UPY 2018

फोटो कॅप्शन, शेन ग्रॉस यांनी सी हॉर्सचं हे छायाचित्र भरपूर प्लँक्टन असलेल्या एका तलावात घेतलं होतं. एकाचवेळी तीन सी हॉर्स कॅमेऱ्यात कैद करण्यात त्यांना यश आलं.
बहामाच्या फ्रीपोर्टजवळ कॅरेबियन रीफ शार्क्सवर क्रिस्टिना झेनाटो गेली 24 वर्षं अभ्यास करत आहेत. शार्क आणि त्यांच्यात निर्माण झालेलं अनोखं नातं त्यांना शार्कच्याजवळ जाण्यासाठी अनुकूल असतं. फॅन पिंग यांनी टीपलेलं हे छायाचित्र.

फोटो स्रोत, FAN PING/UPY 2018

फोटो कॅप्शन, क्रिस्टिना झेनाटो गेली 24 वर्षं बहामाच्या फ्री पोर्टजवळ कॅरेबियन रीफ शार्क्सचा अभ्यास करत आहेत. शार्क आणि त्यांच्यात निर्माण झालेलं अनोखं नातं त्यांना शार्कच्याजवळ जाण्यासाठी अनुकूल असतं. फॅन पिंग यांनी टीपलेलं हे छायाचित्र.
'इल'बरोबर सोंगदा कै यांचा अनेकदा सामना झाला आहे. पण या अनोख्या सागरी जीवाचं हे तीचं सर्वात आवडतं छायाचित्र आहे.

फोटो स्रोत, SONGDA CAI/UPY 2018

फोटो कॅप्शन, 'इल'बरोबर सोंगदा कै यांचा अनेकदा सामना झाला आहे. पण या अनोख्या सागरी जीवाचं हे त्यांचा सर्वांत आवडतं छायाचित्र आहे.
जेलिफीशच्या टेंटॅकल्स आणि बेलमध्ये स्वतःला सामावून घेण्यात यशस्वी झालेल्या माशाचं हे छायाचित्रं. दोन्ही सोबतच विहार करत होते. हे विचीत्र संयोजन टीपण्यात स्कॉट गट्सी टुअसन यांना यश आलं. आणि मिळाला एक शानदार फोटो.

फोटो स्रोत, SCOTT GUTSY TUASON/UPY 2018

फोटो कॅप्शन, जेलिफीशच्या टेंटॅकल्स आणि बेलमध्ये स्वतःला सामावून घेण्यात यशस्वी झालेल्या माशाचं हे छायाचित्रं. दोघे सोबतच विहार करत होते. हे विचीत्र संयोजन टिपण्यात स्कॉट गट्सी टुअर्सन यांना यश आलं.
दोन दिवस उथळ पाण्यात सकाळी पाच ते आठ वाजपर्यंत उभं राहील्यानंतर फिलीप्पो बोर्घी यांना माशाची शिकार करणाऱ्या कॉर्मोरंटचं हे छायाचित्र मिळालं.

फोटो स्रोत, FILIPPO BORGHI/UPY 2018

फोटो कॅप्शन, दोन दिवस उथळ पाण्यात सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत उभं राहील्यानंतर फिलीप्पो बोर्घी यांना माशाची शिकार करणाऱ्या कॉर्मोरंटचं हे छायाचित्र मिळालं.
तान्या हुप्परमन्स यांनी घेतलेलं हे छायाचित्र. छोट्या माशांनी घेरलेल्या सँड टायगर शार्कचं छायाचित्र घेण्यासाठी त्या पाठीवर पोहत होत्या.

फोटो स्रोत, TANYA HOUPPERMANS/UPY 2018

फोटो कॅप्शन, तानिया हुप्परमन्स यांनी घेतलेलं हे छायाचित्र. छोट्या माशांनी घेरलेल्या सँड टायगर शार्कचं छायाचित्र घेण्यासाठी त्या पाठीवर पोहत होत्या.
टोंगाच्या हा'अपइ आयलँडच्या परिसरात सिमोन माटूस्सी हे पत्नीसह पोहत असताना या व्हेल माशांशी त्यांचा समाना झाला. ही आमच्यासाठी अतंत्य अतुल्य अशी गोष्ट होती असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, SIMONE MATUCCI/UPY 2018

फोटो कॅप्शन, टोंगाच्या हाअपाई बेटांच्या परिसरात सिमोन माटूस्सी हे त्यांच्या पत्नीसह पोहत असताना या व्हेल माशांशी त्यांचा समाना झाला. ही आमच्यासाठी अतंत्य अतुल्य अशी गोष्ट होती असं ते म्हणाले.
रशियातील कर्ली लेक परिसरात अस्वलांची संख्या भरपूर आहे. त्यामुळंच माइक कोर्स्टेलेव यांनी पाण्यात ठेवलेल्या रीमोट कॅमेऱ्यामध्ये साल्मोन माशांची शिकार करणाऱ्या अस्वलाचं इतक भारी छायाचित्र मिळालं.

फोटो स्रोत, MIKE KOROSTELEV/UPY 2018

फोटो कॅप्शन, रशियातल्या कर्ली लेक परिसरात अस्वलांची संख्या भरपूर आहे. त्यामुळेच माइक कोर्स्टेलेव यांनी पाण्यात ठेवलेल्या रीमोट कॅमेऱ्यामध्ये साल्मोन माशांची शिकार करणाऱ्या अस्वलाचं इतक भारी छायाचित्र मिळालं.
क्यूबाच्या समुद्रात आढळणाऱ्या मगरींच हे छायाचित्र बोरूट फर्लान यांनी हे छायाचित्र घेतलं. पाण्यातील प्रतिबिंबाने हे छायाचित्र अधिकच आकर्षक झालं आहे.

फोटो स्रोत, BORUT FURLAN/UPY 2018

फोटो कॅप्शन, क्यूबाच्या समुद्रात आढळणाऱ्या मगरींच हे छायाचित्र बोरूट फर्लान यांनी घेतलं आहे. पाण्यातील प्रतिबिंबानं हे छायाचित्र अधिकच आकर्षक झालं आहे.

11 श्रेणींमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मॅक्रो, वाईड अँगल, हावभाव यासह फोटोग्राफरचं निरीक्षण असे निकष त्याला लावले गेले होते. शिवाय ब्रिटीश छायाचित्रकारांसाठी तीन आणखी श्रेणी होत्या.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)