आजची चंद्रग्रहणाची रात्र वेगळी का?
सुपर मून, ब्लू मून आणि ब्लड मून हे सगळं एकाच वेळी दिसणार आणि त्यातून हे खग्रास चंद्रग्रहण. असा दुर्मीळ खगोलीय योग आला आहे 152 वर्षांनी. म्हणूनच आत्ताचं हे चंद्रग्रहण विशेष आहे.
चंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला घडत आहेत. आजचं खग्रास चंद्रग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया आणि आणखी काही पूर्व आशियायी देशांतून दिसणार आहे. 6.21 ला सुरू होणारं ग्रहण 7.37 पर्यंत असेल. ही 76 मिनिटं कुठल्याही दुर्बिणीशिवाय बघता येईल.
मुंबईच्या नेहरू तारांगणाच्या प्रांगणातून हा तिहेरी सोहळा पाहण्यासाठी गर्दी जमली आहे. नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांच्याकडून बीबीसी मराठीने या घटनेचं महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
अरविंद परांजपे यांच्याबरोबर फेसबुक लाईव्हचा व्हीडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
या चंद्रासंदर्भातल्या 3 महत्त्वाच्या घटना कुठल्या?

फोटो स्रोत, GAVIN JACKMAN
ब्लूमून - इंग्रजी कॅलेंडरनुसार एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला ब्लूमून असं म्हणतात. या वेळी जानेवारीमध्ये आलेली ही दुसरी पौर्णिमा असल्याने हा ब्लूमून डे आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुपरमून - चंद्र पृथ्वीच्या जवळ आला की त्या घटनेला सुपर मून म्हणतात. 14 पट जवळ आल्यामुळे तो मोठा दिसतो. पौर्णिमेचा चंद्र असल्यानं तो आणखी मोठा दिसतो आहे. या अगोदर 3 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सुपरमून होता. चंद्र पृथ्वीपासून 3, 56,500 किलोमीटरच्या परिघावरून फिरतोय. ही सर्वांत जवळची स्थिती आहे.
ब्लडमून - चंद्रग्रहणादरम्यान पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे पृथ्वीवरून बघताना चंद्र काळा दिसायला हवा. पण पृथ्वीवरच्या वातावरणामुळे तो लाल दिसतो. पूर्ण अंधारात, खग्रास चंद्रग्रहणाच्या पूर्णावस्थेत चंद्र लालसर रंगाचा दिसणार आहे. याला ब्लडमून म्हणतात. याचं कारण सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोचत असतो आणि त्यामध्ये पृथ्वी येते. सूर्यप्रकाशातली सर्वांत मोठी तरंगलांबी लाल रंगाची असल्यानं हा रंगच या वेळी प्रकर्षानं दिसतो. म्हणून हा लाल चंद्र दिसतो.

फोटो स्रोत, Ross Harwood
ही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे.
जगभरातले खगोलप्रेमी या घटनेची नोंद घ्यायला उत्सुक आहेत. 'नासा'च्या वेबसाईटवरून या घटनेचं चित्रिकरण दाखवलं जात आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









