नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातील भन्नाट फोटो

2018 या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातील काही खास फोटो तुम्ही इथं पाहू शकता.

ऑन्टारियोतल्या नायगारा धबधब्यावरील खडक आणि निरीक्षण पॉइंट संपूर्णत: बर्फानं आच्छादले आहेत. या अगोदर 2014 सालच्या जानेवारीत पाण्याचं बर्फात रुपांतर झालेलं बघायला मिळालं होतं. त्यावेळी तापमान -19C वर पोहचलं होतं.

फोटो स्रोत, GEOFF ROBINS/ AFP

फोटो कॅप्शन, हे चित्र नायगरा धबधब्याचं आहे. गोठवणाऱ्या थंडीमुळे धबधबा तर गोठला आहेच, पण निरीक्षण पॉइंटची अशी स्थिती झाली आहे. यापूर्वी 2014च्या जानेवारीत धबधबा गोठला होता. त्यावेळी तापमान -19 से. होतं.
उत्तर कोरियाच्या प्योगयांग इथं इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या बर्फाच्या शिल्पकलेसमोर छायाचित्र काढण्याकरता लोक एकत्र आले होते. त्यावेळी तादाँग नदीवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

फोटो स्रोत, KYODO / REUTERS

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाच्या प्योगयांग इथं इंटरकाँटिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या बर्फाच्या शिल्पासमोर छायाचित्र काढण्याकरता लोक एकत्र आले होते. त्यावेळी तादाँग नदीवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केरळमधल्या कोचिन कार्निव्हल उत्सवात भाग घेण्यासाठी तयारी करत असलेला माणूस.

फोटो स्रोत, SIVARAM V / REUTERS

फोटो कॅप्शन, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केरळमधल्या कोचिन कार्निव्हलमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत असलेला कलाकार.
31 डिसेंबरच्या रात्री इंग्लंडमधील अलान्डेल येथील गावकरी डांबर जाळलेली पेटी डोक्यावर घेऊन जात आहेत. ही अशी एकूण 45 माणसं आहेत, ज्यांना गायझर्स म्हटलं जातं. शेवटी ही सर्व मंडळी गावातील केंद्रस्थानी जमतात आणि पेट्यांना फेकून देतात. जी व्यक्ती सर्वात शेवटी पेटी फेकते, तिची निंदा केली जाते.

फोटो स्रोत, NIGEL RODDIS/ EPA

फोटो कॅप्शन, 31 डिसेंबरच्या रात्री इंग्लंडमधील अलान्डेल गावामधले गावकरी जळत्या डांबराची पेटी डोक्यावर घेऊन जात आहेत. ही अशी एकूण 45 माणसं आहेत, ज्यांना गायझर्स म्हटलं जातं. शेवटी ही सर्व मंडळी गावातल्या मध्यभागी जमतात आणि पेट्यांना फेकून देतात. जी व्यक्ती सर्वांत शेवटी पेटी फेकते, तिची निंदा केली जाते.
मध्य लंडनमधील लंडन आयवर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.

फोटो स्रोत, VICTORIA JONES/ PA

फोटो कॅप्शन, लंडनमधील 'लंडन आय'वर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
ब्राझिलियन सर्फर लुकास चुम्बो 2018 सालच्या पहिल्या सत्रादरम्यान रायडिंग करताना. हे सत्र पोर्तुगालच्या नझारे इथं आयोजित करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, PATRICIA DE MELO MOREIRA / AFP

फोटो कॅप्शन, ब्राझिलियन सर्फर लुकास चुम्बो 2018 सालच्या पहिल्या सत्रादरम्यान रायडिंग करताना. हे सत्र पोर्तुगालच्या नझारे इथं आयोजित करण्यात आलं होतं.
लिव्हरपूलमध्ये पार्क केलेल्या गाड्या आगीच्या भस्मासुरात जळून खाक झाल्या. एकूण 1300 वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ईको अरेनाकडून 'लिव्हरपूल इंटरनॅशनल हॉर्स शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाच ही आग लागल्यामुळे शेकडो लोक आगीत अडकून पडले होते.

फोटो स्रोत, MERSEYSIDE FIRE AND RESCUE SERVICE

फोटो कॅप्शन, लिव्हरपूलमध्ये पार्क केलेल्या गाड्या आगीच्या भस्मासुरात जळून खाक झाल्या. एकूण 1300 वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ईको अरेनाकडून 'लिव्हरपूल इंटरनॅशनल हॉर्स शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाच ही आग लागल्यामुळे शेकडो लोक आगीत अडकून पडले होते.
न्यू यॉर्क सिटीच्या कोनी आयलँड पोलार बीअर क्लबवर न्यू इयर डे प्लंजमध्ये पोहणाऱ्यांनी अति थंड पाण्यात धावण्याची स्पर्धा केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यू यॉर्क सिटीच्या कोनी आयलँड पोलार बीअर क्लबवर न्यू इयर डे प्लंजमध्ये पोहणाऱ्यांनी अति थंड पाण्यात धावण्याची स्पर्धा केली.
अहमदाबाद येथे आठवडाभरासाठी आयोजित केलेल्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी योग करताना शाळकरी मुले.

फोटो स्रोत, AMIT DAVE/ REUTERS

फोटो कॅप्शन, अहमदाबाद येथे आठवडाभरासाठी आयोजित केलेल्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी योग करताना शाळकरी मुले.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)