पाकिस्तान कावेबाज आणि खोटारडा, त्यांना केलेली मदत व्यर्थ : ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानला 'कावेबाज' आणि 'खोटारडा' असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानवर शरसंधान साधलं आहे.
गेल्या 15 वर्षांमध्ये पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची मदत करणं हा मूर्खपणा होता, असं विधान डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.
सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये ट्रंप यांनी म्हटलं आहे, "अमेरिकेनं गेल्या 15 वर्षांमध्ये पाकिस्तानला 33 अब्ज डॉलरपेक्षा अधिक निधी सहकार्य म्हणून दिला आहे. त्या बदल्यात पाकिस्तानकडून खोटेपणा आणि कपटाशिवाय काहीच मिळालं नाही."
"पाकिस्तानला वाटतं अमेरिकेचे नेते मूर्ख आहेत. आपण ज्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये शोधत आहोत त्या सर्वांना पाकिस्ताननं त्यांच्या देशात आश्रय दिला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ट्रंप यांच्या विधानावर पाकिस्ताननं प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ट्वीट केलं आहे, "आम्ही लवकरचं राष्ट्रपती ट्रंप यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देऊ. लवकरच आम्ही जगासमोर सत्य मांडू. कल्पना आणि वास्तवातला फरक आम्ही दाखवून देऊ."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पाकिस्तानवर टीका करण्याची डोनाल्ड ट्रंप यांची पहिली वेळ नाही. "दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीनं पाकिस्तानने आणखी कठोर पावलं उचलावी असा दबाव आपण टाकायला हवा," असं ट्रंप यांनी म्हटलं होतं.
आपल्या ट्वीटमध्ये ट्रंप यांनी आता पुरे. असं म्हटलं आहे. पण त्यावर प्रतिक्रिया देताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं, "आम्ही याआधीच सांगितलं आहे की आम्ही दहशतवादाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे ट्रंप यांच्या आता पुरे या विधानाला काही अर्थ उरत नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
ट्रंप यांच्या विधानाला पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने उत्तर दिलं आहे. "दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीनं अमेरिकेचा साथीदार म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला आपली जमीन आणि हवाई हद्द वापरू दिली. तसेच त्यांना लष्करी तळासाठी जागा दिली, गुप्तचर विभागाने देखील त्यांना सहकार्य केलं आहे. यामुळंच गेल्या 16 वर्षांत अल-कायदा उद्धवस्त झाली. पण त्या बदल्यात आम्हाला दूषणं मिळाली आणि आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली गेली. आमच्या सीमेपलीकडे राहणाऱ्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी नागरिक ठार केले जातात, या बाबीकडे अमेरिका दुर्लक्ष करत आहे." असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)