फोटो पाहा : जगभरात असा साजरा झाला ख्रिसमस
जगभरात ख्रिसमस आनंदात साजरा होतो आहे. या ख्रिसमसचे हे अनोखे रंग जगभरातल्या नावाजलेल्या छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
1. म्यानमारच्या यंगूनच्या होली ट्रिनिटी कॅथेड्रल समोरची ही सजावट. प्रकाशांच्या सहाय्यानं ख्रिसमस ट्री बनवून तर कमालच केली आहे.

फोटो स्रोत, EPA/lynn bo bo
2. म्यानमारच्या यंगूनमध्ये एका हॉटेलमध्ये फोटो काढणारा एक छोटा सांताक्लॉज.
ख्रिसमसच्या मनोहारी क्षणांचं दृश्य टिपत असताना एका छायाचित्रकारानं या छोट्या सांताक्लॉजची भावमुद्रा अशी टिपली.

फोटो स्रोत, EPA/lynn bo bo
3. इस्राइलच्या ताब्यात असलेल्या बेत्लेहम शहरातील चर्चमधलं एक दृश्य. असं म्हटलं जातं की बेत्लेहममध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता.

फोटो स्रोत, Musa al shaer/getty
4. इंडोनेशियाच्या जाकार्तामध्ये एका कॅथेड्रलसमोर तपासणी करताना बाँबशोधकपथक. ख्रिसमसच्या वेळी देशभरात 90,000 पोलीस तैनात केले जातात.
ख्रिसमसच्या दिवसांत देशात गैरकृत्य होऊ नये यासाठी इंडोनेशिया सरकारकडून विशेष काळजी घेण्यात येते.

फोटो स्रोत, EPA/bagus
5. ख्रिसमसच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीनं खास व्यवस्था केली जाते. सजावटीच्या साहित्यासह धार्मिक स्थळांची कसून तपासणी केली जाते.

फोटो स्रोत, EPA/ bagus
6. व्हिएतनामच्या हनोई शहरात एकदम वेगळ्या पद्धतीनं ख्रिसमस साजरा केला गेला. लहान मुलांना आकर्षक कपडे घालून या माता लहान मुलांसोबत नृत्य करतात.
व्हिएतनाममध्ये 25 डिसेंबरला सरकारी सुटी नसते. पण अलीकडच्या काळात व्हिएतनाममध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा केला जातो.

फोटो स्रोत, EPA/luong
7. मध्य प्रदेशच्या भोपाळमधल्या एक चर्चमध्ये अशी दिलखेचक रोषणाई करण्यात आली होती.

फोटो स्रोत, EPA/ sanjeev gupta
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








