दुष्काळात सापडल्या डायनोसोरच्या खुणा

फोटो स्रोत, Dinosaur Valley
मध्य टेक्सास भागातील एका भीषण दुष्काळात एक डायनोसोर सापडल्याची घटना समोर आली आहे.
टेक्सासमधील वॅली स्टेट पार्कमध्ये डायनोसोरच्या सर्वोत्तम प्रजाती राखून ठेवल्या आहेत असं या पार्काचे अधीक्षक जेफ डेवीस यांनी सांगितलं.
सध्या टेक्सास भागात भीषण दुष्काळ पडला आहे.
गेल्या आठवड्यात टेक्सास राज्याच्या 87% भागात भीषण दुष्काळ पडला आहे. तिथला उन्हाळा अतिशय कोरडा आहे. उष्णतेमुळे टेक्साससमधील एक नदी पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे तिथे आता डायनोसोरची पावलं दिसू लागली आहेत.
डेविस यांनी बीबीसी ला सांगतलं की या पावलांना लोन रेंजर ट्रॅकवे असं म्हणतात. त्या अक्रॅनोथोसॉरस प्रजातीच्या डायनोसोर तिथे 100 फुटांपर्यंत चालला होता. हा एक डायनोसोर 140 वाटांवर गेला होता. त्यातल्या 60 आता दिसू लागल्या आहेत.
अक्रॅनोथोसॉरस हा तीन पायाचा डायनोसोर आहे असं डेविस म्हणाले. त्याची उंची 15 फुट आहे. त्यांचं वजन सात टन आहे.
या डायनोसोरची शिकार सॉरपोसिडन नावाच्या एका वेगळ्या प्रजातीच्या डायनोसोरने केल्याची शंका आहे. त्यांच्या पावलांचे ठसे या पार्कात दिसल आहेत. सॉरपोसिडन 60 फुट उंच आहेत. त्यांची मान लांब असते. जेव्हा ते पूर्णपणे मोठे होतात तेव्हा त्यांचं वजन 44 टन होतो.
सध्या टेक्सासमधल्या वातावरणमामुळे अनेक नवीन गोष्टी लक्षात आल्या आहेत.
मेड तलावात मनुष्यप्राण्यांचेही काही अवशेष सापडले आहेत. तो अमेरिकेतला सगळ्या मोठा तलाव आहे. मात्र पाण्याची पातळी कमी झाल्याने या गोष्टी समोर आल्या आहेत.
तसंच युरोपात पाण्याची पातळी कमी झाल्याने 'भूकेचे दगड' असं म्हणतात. ते नदीच्या पाण्याच्या एक विशिष्ट पातळीला दुष्काळादरम्यान दिसतात. जेव्हा या दगडांची पातळी पाण्याच्या वर असते तेव्हा नक्की काहीतरी संकट येणार आहे असा संदेश त्यातून देण्याचा हा उद्देश आहे.
सगळे दुष्काळ हवामान बदलामुळे होत नाही. वातावरणातल्या अतिरिक्त उष्णतेमुळे जमिनितून अतिरिक्त आर्द्रता बाहेर पडते आणि त्यामुळे दुष्काळी स्थिती आणखी भीषण होते. जगाचं तापमान आधीच1.2 अंशाने वाढलं आहे आणि सरकार काही पावलं उचलत नाही तोपर्यंत ते वाढतच जाणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








