'महाकालकडून मागवलं'...हृतिकच्या जाहिरातीवरून वाद आणि माफीही

फोटो स्रोत, Social Media
लाल सिंह चढ्ढा, रक्षाबंधन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू असताना आता 'बॉयकॉट झोमॅटो' हा ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे. हृतिक रोशनने केलेल्या एका जाहिरातीने वादाला तोंड फुटले आहे.
उज्जैनच्या 'महाकाल'चा अपमान झाला असा आरोप झोमॅटोवर करण्यात आला आहे. त्यानंतर झोमॅटोने माफी देखील मागितली आहे. पण सध्या ट्विटरवर बॉयकॉट झोमॅटो, झोमॅटो इंसल्ट्स महाकाल असे ट्रेंड सुरू आहेत.
ब्लॅक कमांडोची टीम एका व्हॅनमध्ये बसलेली असते. आतमध्ये हे कमांडोज अत्याधुनिक शस्त्रं घेऊन बसलेले असतात. त्या व्हॅनवर जोराने थाप पडते आतमध्ये बसलेले कमांडोज सावध होतात आणि दरवाजा उघडतात. बाहेर एक झोमॅटोचा डिलेव्हरी एक्झिकेटिव्ह जेवण घेऊन येतो. एक कमांडो विचारतो, 'हे कुणी मागवलं आहे', त्यावर हृतिक रोशन म्हणतो, 'मी मागवलं आहे. उज्जैनमध्ये होतो तर महाकालकडून मागवलं.'

फोटो स्रोत, Zomato
या जाहिरातीनंतर उज्जैन महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी यावर निषेध व्यक्त केला. पंडित महेश पुजारी म्हणाले, "महाकाल मंदिरातून अशी कोणतीच थाळी विकली जात नाही. येथील थाळी हा निशुल्क प्रसाद आहे. पुढे ते म्हणाले, अशा प्रकारे जाहिरातीमध्ये मंदिराचा उल्लेख करने चुकीचे आहे."
पुढे ते म्हणाले की "हृतिक रोशनने त्वरित माफी मागावी. झोमॅटोने या जाहिरातीचे प्रसारण थांबवावे. लोकांनी धर्माचा खेळ मांडलाय आणि हे सातत्याने होत आहे. या मागणीनंतर ट्विटरवर बॉयकॉट झोमॅटो ट्रेंड सुरू झाला."
झोमॅटोने मागितली माफी
मंदिराचे पुजारी आणि ट्विटरवर निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर झोमॅटोने माफी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की आम्ही उज्जैनच्या लोकांच्या भावनांचा मनापासून आदर करतो. ज्या जाहिरातीचा उल्लेख झाला आहे ती चालवली जाणार नाही. आम्ही सर्वांची गांभीर्याने माफी मागतो. कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतूने नव्हता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आम्ही जाहिरातीमध्ये केलेला उल्लेख हा महाकाल रेस्टॉरंटचा होता. महाकालेश्वर मंदिराचा नव्हता. महाकाल रेस्टॉरंट हे उज्जैनमधील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. त्या ठिकाणाहून खूप ऑर्डर्स आमच्याकडे येतात.
ही जाहिरात एका मोहिमेचा भाग आहे. देशातील प्रत्येक शहरात सर्वाधिक चालणाऱ्या रेस्टॉरंटचा आम्ही उल्लेख करणार होतो आणि त्याच मोहिमेचा भाग महाकाल रेस्टॉरंट देखील आहे, असं स्पष्टीकरण झोमॅटोने दिले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








