प्रदीप पटवर्धन यांना 'मोरूची मावशी'मधून अनपेक्षितपणे बाहेर पडावं लागलं, कारण...

प्रदीप पटवर्धन

फोटो स्रोत, Doordarshan Sahyadri

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. गिरगावमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे.

कॉलेजमध्ये त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकांमधून भूमिका साकारल्या.

टूरटूर, मोरुची मावशी, भटाला दिली ओसरी ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती.

रंगभूमीनंतर त्यांनी आपला मोर्चा टेलिव्हिजन आणि चित्रपटांकडेही वळवला.

प्रदीप पटवर्धन यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या.

'गोविंदामध्ये पट्या नाचतोय म्हटल्यावर...'

प्रदीप पटवर्धन यांना नृत्याची खूप आवड होती.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'दुसरी बाजू' या कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी प्रदीप पटवर्धन यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी आपल्या नृत्याच्या आवडीबद्दल सांगितलं होतं. गोविंदामधल्या नाचाची आठवणही सांगितली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"त्यावेळी गोविंदा खूप उत्साहात व्हायचा. शोभायात्रा असायच्या. गोविंदामध्ये नाचणं ही एक गंमत होती. आजच्यासारखं यायचं आणि हंडी फोडून जायचं असा प्रकार नव्हता. आमच्या गोविंदामध्ये मी अगदी सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत नाचायचो.

झावबावाडीचा गोविंदा निघाला की 'पट्या' नाचतोय म्हटल्यावर गर्दी जमायची. पोलिसांना आम्हाला सांगायला लागायचं. मला आठवतंय की, आमचा गोविंदा जेव्हा गिरगावात पोहोचायचा तेव्हा मला पाहायला पेडर रोडवरून लोक यायचे."

प्रदीप पटवर्धन

फोटो स्रोत, Facebook

याच कार्यक्रमात प्रदीप पटवर्धन यांनी आपण कायम बसनं का फिरतो हेही सांगितलं होतं. बसमधून प्रवास करताना माणसं दिसतात, कॅरेक्टर्स भेटतात असं त्यांनी म्हटलं होतं.

"टॅक्सीने सगळेच जण जातात. पण मी आजही बस आणि ट्रेननं जातो. मला लोक विचारतात की, तुम्ही बस-ट्रेननं फिरता. मी म्हणायचो- मी कॉमन माणूस आहे. कलाकार आहे तो स्टेजवर.

बसमधून, ट्रेनमधून फिरताना माणसं भेटतात, कॅरेक्टर्स भेटतात. चौथी सीट असेल तर तो माणूस बसतो आणि आपण गेलो की आपल्याकडे असं बघतो... मला वाटतं काहीतरी गुन्हा केलाय. त्याला चौथी सीट मिळाली की आनंद होतो. पण आपण चौथ्या सीटवर बसायला गेल्यावर त्याचा जो चेहरा असतो तो पाहण्यालायक होतो."

या कारणामुळे 'मोरूच्या मावशी'तून ब्रेक

प्रशांत दामले, विजय चव्हाण आणि प्रदीप पटवर्धन यांनी 'मोरुच्या मावशी'चे जवळपास पाचशे प्रयोग एकत्र केले होते. पुढे प्रशांत दामले या नाटकातून बाहेर पडले. ते सुयोगचं दुसरं नाटक तेव्हा करत होते.

व्हीडिओ कॅप्शन, 'मोरुची मावशी' नाटक प्रदीप पटवर्धनांनी का सोडलं होतं?

प्रदीप पटवर्धन यांना मात्र अतिशय अनपेक्षितपणे ब्रेक घ्यावा लागला होता. त्यांनी स्वतःच याबद्दल विक्रम गोखलेंशी बोलताना सांगितलं होतं.

1990 साली प्रदीप पटवर्धन मृच्छकटीक ही संस्कृत सीरिअल करत होते. त्यात ते शर्विलकाची भूमिका करायचे. त्यात त्यांना सहा फुटांवरून उडी मारायची होती. रिहर्सलमध्ये ती उडी बरोबर पडली. पण नंतर टेकला खाली कोबावर पाय आपटला आणि घोट्याला जबरदस्त मार लागला. पायात सळी टाकावी लागली.

त्यामुळे जवळपास दीड वर्षं ते घरीच होते.

"मोरुची मावशी फुल फॉर्ममध्ये सुरू होतं आणि मी घरी होतो. मी इतका रडलो त्या काळात की, आपण काही करू शकत नाही," असं त्यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)