बोटाद: गुजरातमध्ये विषारी दारू पिऊन 31 जणांचा मृत्यू

बनावट दारू

फोटो स्रोत, BBC Gujarati

गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिड गावात बनावट दारू पिऊन किमान 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनी गुजरातचे गृहसचिव राजकुमार यांनी सांगितले की या घटनेला गांभीर्याने घेण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अनेक जणांची प्रकृती अस्थिर आहे. या लोकांना भावनगर, बोटाद आणि अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे.

काही महिन्यांपूर्वीच दिली होती तक्रार

रोजिड गावचे सरपंच जिगर डुंगरानी यांनी या घटनेसाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरत निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, "तीन चार महिन्यांपूर्वीच मी प्रशासन, एसपी, पीएसआय, तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर जर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. पण त्यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही."

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळे पथक तैनात केले आहे आणि या इतर भागात बनावटी दारूची विक्री होत असेल तर हे तपासण्यासाठी सांगितले आहे.

आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

ते म्हणाले, "गुजरातमध्ये दारूबंदी असून देखील दारू मिळते. सर्वांना माहीत आहे की हा पैसा कुठे जातो. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आले तर दारूबंदीचे कठोर पालन होईल."

'अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांचे आशीर्वाद'

काँग्रेस नेते अमित चावडा यांनी द हिंदूला सांगितले की "बनावट दारूचा व्यवसाय करणारे आणि पोलिसांची हातमिळवणी आहे. राज्यात अवैध दारू विकली जात आहे पण भाजप सरकार त्यांना आश्रय देत आहे. पोलीस त्यांच्याकडून हफ्ते घेत आहेत."

या प्रकरणात गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत गुजरात काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी म्हटलं आहे की, "गुजरातमध्ये गुजरात सरकारच्या आशीर्वादाने राज्यात कोट्यवधीची बनावट दारू विकली जात आहे. सरकार केवळ यावर सर्क्युलर काढण्यातच व्यग्र आहे."

विषारी दारू

या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.

बीबीसी गुजरातीचे सहकारी पत्रकार सचिन पिथवा यांनी सांगितले की ही बनावट दारू बरवाला तालुक्यातील चोकडी गावात बनली होती. त्या ठिकाणी देखील पोलिसांनी तपासासाठी आपले पथक पाठवले आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)