एकनाथ शिंदे बंड: 'आयजींना नाकाबंदी करा असं सांगितलं पण...' एकनाथ शिंदे सीमापार कसे झाले?

फोटो स्रोत, FACEBOOK/EKNATH SHINDE
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण ढवळले. एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास शिवसेना आमदारांनी त्यांना आज पाठिंबा दर्शवला. आज बहुमत चाचणी घेण्यात आली त्यात सर्व शिवसेना बंडखोर आमदारांनी तर त्यांना मतदान तर केलेच पण त्याचबरोबर ऐनवेळी संतोष बांगर हे आमदार देखील एकनाथ शिंदे गटाला येऊन मिळाले.
त्यांच्या बंडांनंतर सर्वांना एक प्रश्न पडला होता तो म्हणजे जेव्हा व्हीआयपी मूव्हमेंट होते तेव्हा त्याची माहिती पोलीस खात्याला असते. पण त्यातून शिंदे आणि त्यांचे आमदार बाहेर पडले. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत भाष्य केले आहे.
"तुमच्याकडे टॉवर लोकेशन आहे. पटापट आम्हाला पकडता आलं असतं. आयजींना नाकाबंदी करा सांगण्यात आलं. पण मीही अनेक दिवस काम करतो आहे. नाकाबंदीतून वाट काढून कसं जायचं हे मला माहिती आहे."
विधानसभेत ते बोलत असताना विरोधी बाकांवरून आवाज आला मग आयजींच्या तावडीतून कसे सुटलात त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "तुम्ही माझ्याकडून सगळं काढून घेणार का? असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून म्हणताच सभागृहात हशा पिकला. ते खासगीमध्ये सांगेन.
"नाहीतर तुम्हीपण तसंच कराल," असं मुख्यमंत्री म्हणताच अख्खं सभागृह हास्यकल्लोळात दंग झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगीही डोक्याला हात लावून या किश्श्याची मजा लुटली.
'माझं खच्चीकरण झालं'
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना खच्चीकरण झालो आणि त्यातून हे बंड झाल्याचं शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काय घडलं याबद्दल त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
"ज्यावेळी आम्ही विधानभवनातून निघालो त्याच्या आदल्या दिवशी मी डिस्टर्ब होतो. मला जी वागणूक मिळाली त्याचे हे आमदार साक्षीदार आहेत. एकाही आमदाराने हे मिशन सुरू झालं तेव्हा विचारलं नाही कुठे चाललो? कधी येणार? सुनिल प्रभूंनाही माहिती आहे माझं कसं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला."
"मला अनेकांचे फोन आले. पण मी ठरवलं होतं. शहीद झालो तरी मागे फिरायचे नाही. ही छोटी मोठी घटना नाही. हे एका दिवसांत झालेली नाही. हे खूप आधीपासून सुरू झालं."
"एकीकडे चर्चेला माणसं पाठवायची आणि दुसरीकडे पुतळे जाळायला लावायचे. घरावर दगडफेक करायला सांगायची. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करणारा अजून पैदा झाला नाही. दगड मारणारे हात राहणार नाहीत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








