महाराष्ट्रात पाऊस 'या' तारखेपासून चांगला पडणार, हवामान विभागाचा अंदाज

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात 5 जुलैपासून चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागाचे पुणे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, "येत्या 48 तासात ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसात राज्यात 5 जुलै पासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मुंबई आणि कोकण परिसरामध्ये काल जोरदार पाऊस
दरम्यान, मुंबई आणि कोकण परिसरामध्ये कालपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली.
सुरुवातीला जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र जूनचा संपू्र्ण महिना म्हणावा तितका पाऊस पडला नाही.
आता जुलै महिन्यात पावसाने मुंबई आणि परिसरावर संततधार धरली आहे. तसेच नवी मुंबईत घणसोली, वाशी येथेही मुसळधार पाऊस पडत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आज 1 जुलै रोजी मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस कोसळत असून काही ठिकाणी पाणीही साचले आहे.
सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. आज मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात झाली. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड येथे मुसळधार पाऊस सुरू आहे.
अमेक नागरिकांनी या पावसामुळे मुंबईत पाणी साचल्यामुळे होत असलेल्या गैरसोयीचे व्हीडिओ आणि फोटो ट्वीट केले आहेत. जे. जे. फ्लायओव्हर, अंधेरी रेल्वे स्टेशन, वांद्रे, हिंदमाता, खोदादाद सर्कल येथे पाणी साचल्याची माहिती नागरिक देत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
हेही वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)