Archies : शाहरूखची मुलगी, अमिताभ यांचा नातू , श्रीदेवी यांची कन्या झळकणार 'या' सिनेमात

फोटो स्रोत, NETFLIX
'द आर्चिज' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा नेपोटीझमवरून चर्चेला सुरुवात झाली आहे.
झोया अख्तर दिग्दर्शिका असलेल्या 'द आर्चिज' या सिनेमात एक, दोन नव्हे तर तीन 'स्टार किड़्स' आहेत.
शाहरूख खानची मुलगी सुहाना, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
शाहरूखचा मुलीसाठी भावुक संदेश
हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म 'नेटफ्लिक्स'वर येणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे.
सिनेमात 1960 च्या काळातील चित्र उभं करण्यात आलं आहे. त्यामुळे टीझरमध्येही सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत.

फोटो स्रोत, Gauri khan/twitter
शाहरुख खानने आपल्या मुलीच्या पहिल्या सिनेमाचा टीझर पोस्ट करत तिच्यासाठी एक भावूक संदेश लिहिला आहे.
आपल्या पोस्टमध्ये शाहरूख म्हणतो, "सुहाना, कायम लक्षात ठेव तू कधीही परफेक्ट बनू शकणार नाहीस. पण त्याच्या जवळ जाण्यासाठी तू जशी आहेस तसा राहण्याचा प्रयत्न करू शकतेस. अभिनेत्री असताना मिळणारं कौतुक हे तू स्वत:कडे ठेवण्यासाठी नाही. स्क्रिनवर जो तुझा अभिनय देशील तो तुझ्याशी संबंधित राहणार आहे. तू खूप मोठा प्रवास केला आहेस पण लोकांच्या मनापर्यंत पोहचण्याचा मार्ग कधीही न संपणारा आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अमिताभ बच्चन यांनीही नातू अगस्त्य नंदा याला त्याच्या नवीन कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'अजून एक उदय' असं म्हणत त्यांनी सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
नेपोटिझमची टीका
2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एकाबाजूला आर्चिज या लोकप्रिय कॉमिक्स बुकवर सिनेमा बनत असल्याची उत्सुकता आहे, तर दुसऱ्याबाजूला बॉलीवूडमधल्या तीन दिग्गज कुटुंबातील मुलं सिनेमात असल्याने 'नेपोटीझम' होत असल्याची टीका होतेय.
बॉलीवूडसाठी तसा नेपोटिझमचा वाद काही नवीन नाही. कोणत्याही सिनेमात जिथे बॉलीवूड कलाकारांच्या कुटंबातील सदस्य सहभागी असतात तिथे नेपोटिझमचा वाद सुरू होतो. नि:पक्षपातीपणे संधी न देता कलाकारांच्याच कुटुंबियांना संधी मिळते अशी टीका केली जाते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
दिव्यांश नावाच्या युजरनं म्हटलंय की, बॉलिवूडल्या महान अभिनेत्याच्या मुलीसाठी चित्रपटात जाणं हे किती सोपं ठरू शकतं.
इशान नावाच्या युझरनं म्हटलं आहे की, सुहाना खानपेक्षाही टॅलेंटेड असलेले अनेक जण आहेत, पण त्यांना चित्रपट मिळत नाहीत. शाहरूख खान स्वतःही आउटसाइडर होता आणि त्यालाही पहिला सिनेमा इतक्या सहजासहजी मिळाला नव्हता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
'द आर्चिज' सिनेमाच्या टीझरनंतरही अनेकांनी सोशल मीडियावर हेच मत व्यक्त केलं आहे, तर काहींनी याचं समर्थन सुद्धा केलं आहे.
नेपोटिझमच्या नावानं ओरड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे निर्माते त्यांचा पैसा लावून चित्रपट बनवत असतात आणि त्यात कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. तो चित्रपट पाहायचा की नाही हे लोकांनी ठरवावं, असं अरूण नायर यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
काय आहे 'आर्चिज'?
हा सिनेमा लोकप्रिय इंग्रजी कॉमिक्स बुक 'आर्चिज'वर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे.
रिव्हलडेल नावाचं काल्पनिक गाव आणि याठिकाणी राहणारे किशोरवयीन मित्र-मैत्रिणी यांच्या नातेसंबंधांवर आणि प्रेम-त्रिकोणावर आधारित हे कॉमिक्स बुक आहे आणि यावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
आर्चिज या कॉमिक्स बुकमधील पात्र हे कलाकार साकारणार आहेत.
सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे. खुशी कपूरने या सिनेमात बेट्टीचं पात्र साकारलं आहे. अगस्त्य नंदा या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. तसंच मिहिर अहुजा, डॉट, वेदांग रैना, युवराज मेंडा या कलाकारांचाही समावेश आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)