You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दोन बाळंतपणांमध्ये किती अंतर असावं? याबद्दल डॉक्टर काय सांगतात?
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास दोन बाळांमध्ये निदान एका वर्षाचं अंतर असावं असं एका अभ्यासानुसार समोर आलं आहे.
मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 18 महिन्याचं अंतर असावं असं संशोधकांचं मत आहे.
जर दोन बाळंपतणाच्या मध्ये कमी अंतर असलं तर प्रीमॅच्युअर बेबी होण्याचा धोका असतो, मुलं आकाराने लहान असतात आणि बाळाचा आणि बाळाच्या आईचा मृत्यूदर जास्त असतो.
या संशोधनामुळे जास्त वयाच्या बायकांना फायदा होऊ शकतो असं संशोधकांचं मत आहे.
या शोधअभ्यासाचे एक लेख डॉ. वँडी नॉर्मन म्हणाले की 35 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
त्या म्हणाल्या, "या संशोधनामुळे ज्या स्त्रिया जास्त वयात माता झाल्या त्यांना बाळंतपणांमध्ये योग्य अंतर ठेवणं शक्य होईल"
"एका वर्षाचं अंतर ठेवणं बहुतांश स्त्रियांना शक्य आहे. पुढची गुंतागुंत टाळण्यासाठीही हा उत्तम उपाय आहे." त्या पुढे म्हणाल्या.,
हे संशोधन कॅनडात 150000 जन्मानंतर करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया आणि हार्वर्ड विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे.
या संशोधनात असं समोर आलं की दोन बाळंतपणात 12-18 महिन्यात अंतर असावं.
2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे अंतर 24 महिने असावं आणि 18 महिन्यापेक्षा कमी नसावं.
संशोधकांनी आणखी काही गोष्टी शोधल्या आहेत.
-एका वर्षांच्या आत बाळंतपण झालं तर गुंतागुंत होण्याची शक्यता आहे. ही शक्यता सर्व महिलांना लागू आहे.
-35 वर्षांच्या स्त्रियांना हा धोका असतो. तसा हा धोका सर्वच वयाच्या बायकांना असतो आणि मात्र ते 20 ते 34 वयोगटात हा धोका सगळ्यात जास्त आहे.
-ज्या महिला 35च्या नंतर बाळंतिण झाल्या त्यांना 1.2% मृत्यूचा धोका आहे.
-दोन बाळंतपणात 18 महिने अंतर असलं तर धोका 0.5% आहे.
-ज्या बाळंतपणात सहा महिने तर होतं त्यांना 8.5 टक्के धोका आहे. 18 महिने वाट पाहिली तर हा धोका 3.7% होतो.
या संशोधन प्रबंधाच्या मुख्य लेखिता लॉरा शमर्स म्हणाल्या, "जर दोन बाळंतपणात अंतर ठेवलं नाही तर आईला आणि बाळाला धोका निर्माण होतो. 35 वर्षांच्या वरच्या स्त्रियांनाही हा धोका आहे.
" जास्त वयाच्या बायकांसाठी आमचं संशोधन जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्या दोन बाळंतपणात जास्त अंतर ठेवत नाही आणि बरेचदा मुद्दाम त्या असं करतात."
हे संशोधन फक्त कॅनडाच्या बायकांना घेऊन केलं आहे. त्यामुळे जगाच्या इतर भागात ते किती लागू आहे हे स्पष्ट नाहीय
डॉ. सोनिया हेरनाडेझ यांच्या मते प्रत्येक वयोगटासाठी वेगळा धोका आहे.
"बाळंतपणात अंतर कमी ठेवलं तर अवेळी गरोदरपणात वाढ होईल. विशेषत: तरुण बायकांना त्यांचा धोका असतो.
रॉयल कॉलेज ऑफ मिडवाईव्ज च्या मँडी फॉरेस्टर म्हणाल्या की हे संशोधन अतिशय उपयुक्त आहे. या आधी च्या संशोधनासाठी तो पुरक आहे.
"खरंतर हा प्रत्येक बाईचा चॉईस आहे. कोणत्याही वयात असल्या तरी दोन बाळंतपणात किती अंतर ठेवायचं हा त्यांचा निर्णय आहे. मात्र त्यातले खाचखळगे माहिती असावे इतकाच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबरोबरच योग्य माहिती असणंही आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ कायमच त्यांच्या या निर्णयाचा सन्मान ठेवतात."
"महिलांना या बाबतीत गर्भनिरोधनाचा सल्ला देणारेही योग्य लोक हवेत. असंही त्या पुढे म्हणतात."
भारतात काय परिस्थिती आहे?
पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ .शिल्पा चिटणीस जोशी याविषयी माहिती देतात. त्या म्हणतात, "भारतात जेव्हा कुटुंब नियोजनाचा आणि लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम राबवला तेव्हा 21 वर्षाआधी मूल नको आणि दोन मुलांमध्ये तीन वर्षांचं अंतर नको असं बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लोकांना असं वाटलं की तीन वर्षांचं अंतर असावं."
मात्र हल्ली भारतात आणि महाराष्ट्राच्या शहरी भागात एका मुलावरच समाधान मानण्याचा ट्रेंड चालू आहे. दोन असतील तर तीन वर्षांचं अंतर अजूनही योग्य समजलं जातं कारण तेव्हापर्यंत पहिल्या मुलाला योग्य समज आलेली असते. पण शहरी भागात जोडप्याच्या करिअर मुळे हे अंतर आता 3 ते आठ वर्षं इतकं झालं आहे. असं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात एक मूल असण्याचा ट्रेंड असला तरी उत्तर प्रदेश, बिहार, मेघालय या राज्यात एकापेक्षा अधिक मूल असण्याचा ट्रेंड अजूनही आहे.
मात्र हा दोन मुलांमध्ये किती फरक असावा याचा ठोस आकडा सांगता येणार नाही,असंही डॉ.जोशी सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)