सनसनाटी हेडलाईन देऊ नका, केंद्र सरकारचे सर्व खासगी चॅनल्सना आदेश

माध्यम

फोटो स्रोत, Getty Images

सनसनाटी, गैरसमज पसरवणारी, अपशब्द असणारी हेडलाईन देऊ नका, असे आदेश केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. यासंबंधी विशेष पत्रक जारी करत केंद्राने या सूचना भारतातील सर्व खासगी चॅनेल्सना दिल्या आहेत.

रशिया-युक्रेनमधील संघर्ष आणि उत्तर-पश्चिम दिल्लीत घडलेला हिंसाचार या दोन घटनांचा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं या पत्रकात उल्लेख केला आहे.

केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (रेग्युलेशन) अॅक्ट, 1995 अंतर्गत मोडणाऱ्या सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्सना उद्देशून हे सूचनांचं पत्रक केंद्र सरकारनं जारी केलं आहे. या कायद्यातील मार्गदर्शक सूचनांनी आठवण केंद्र सरकारनं चॅनेल्सना करून दिली आहे.

या कायद्यातील सेक्शन 6 मधील पहिल्या भागात म्हटलंय की, सभ्येतेविरोधात कुठलाही कार्यक्रम करू नये, मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांबद्दल टीका टाळावी, धार्मिक किंवा विशिष्ट समूहाबद्दल आक्षेपार्ह शब्द आणि धार्मिक वृत्तीला प्रोत्साहन देणं टाळावं, अश्लील, अवमानकारक, जाणीवपूर्क खोटे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

केंद्र सरकारनं म्हटलंय की, गेल्या काही दिवसात काही सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्सवर काही वृत्तांकनात असं आढळलंय की, चुकीची, गैरसमज पसरवणारी, सनसनाटी आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह भाषा वापरली गेली. या गोष्टी कायद्यातील सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हे सर्व रशिया-युक्रेन संघर्ष आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत प्रकर्षानं दिसून आल्याचंही केंद्र सरकारनं म्हटलंय.

केंद्र सरकारनं रशिया-युक्रेन संघर्षाबाबत चॅनेल्सनी केलेल्या वृत्तांकनातल्या चुका सांगताना म्हटलंय की, "काही चॅनेल्सनं सातत्यानं चुकीचे दावे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना चुकीच्या पद्धतीने कोट केले, तसेच, सनसनाटी हेडलाईन्स वापरल्या, ज्यांचा बातमीशी काहीही संबंध दिसून येत नाही. शिवाय, काही पत्रकारांनी आणि वृत्तनिवेदकांनी प्रेक्षकांना भडकावण्याचा प्रयत्न केला".

केंद्र सरकारनं आपल्या पत्रकात चॅनेल्सची नावं घेऊन याबाबत काही उदाहरणं दिली आहेत.

तसंच, उत्तर-पश्चिम दिल्लीतल्या हिंसाचाराबाबतही केंद्र सरकारनं काही निरीक्षणं मांडली आहेत.

त्यात केंद्र सरकार म्हणालं की, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या, प्रेक्षकांना एखाद्या विशिष्ट समाजाविरुद्ध भडकावणाऱ्या हेडलाईन्स दिसून आल्या, विशिष्ट समूहाचे फूटेज दाखवणं किंवा खोटी विधानं करून हेडलाईन सनसनाटी करून प्रशासनाच्या कारवायांना समाजविघातक रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

तसंच, चॅनेल्सवरील चर्चेत असंसदीय शब्दांचा वापर, प्रक्षोभक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह शब्दांचा वापर, धार्मिक टीका, वादग्रस्त संदर्भ इत्यादी गोष्टी आढळली. या सगळ्याचा नकारात्मक परिणाम प्रेक्षकांवर होऊ शकतो आणि यामुळे समाजातील शांततेचा भंग होण्याची शक्यता असते.

याचीही उदाहरणं केंद्र सरकारनं आपल्या पत्रकात दिली आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)