देवेंद्र फडणवीसांचा घणाघात 'दाऊदच्या इशाऱ्यावर सरकार चालतंय का'

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी आज भाजपकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होतं. त्यानंतर विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता.
चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.
आज आझाद मैदानात झालेल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केला.
"दाऊद इब्राहिमच्या बहिणीची 3 एकर जमीन सॉलिड इन्फ्राला विकली, मलिकांची आहे ही कंपनी, स्फोटातला दोषी जो जेलमध्ये आहे त्याच्याकडून जमीन घेतली," असा आरोप फडणवीसांनी केला.
विक्रीपत्रावर मलिक, शहावलीखान, सलीम पटेल यांच्या सह्या आहेत, त्यांच्यासोबत सह्या करताना तुम्हाला लाज वाटली नाही का?
दाऊदचा दबाव आहे का? फडणवीस यांचा सवाल?
दाऊदच्या बहिणीला पेमेंट करण्यात आलं, ईडीकडे पुरावे आहेत, ज्याने पेमेंट केलं त्याने हे मान्य केलं आहे. हा पैसे तिने कशाकरता वापरला? हा पैसा स्फोटासाठी वापरला, या व्यवहारानंतर मुंबईत तीन स्फोट झाले, अशाच कृत्यांसाठी हे पैसे वापरले. टेरर फंडिंगसाठी मदत करणारा यांचा मंत्री आहे, असं फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे राजीनामा घ्यायचा नाही तर ठीक आहे पण तुम्हाला एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागणार आहे.

फोटो स्रोत, OTHER
बीबीसी मराठीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दाऊदच्या इशाऱ्यावर सरकार चालतं का हा आमचा प्रश्न आहे. राजीनामा घेत नाही कारण दाऊदचा दबाव आहे का?"
महापालिका निवडणुकांसाठी हे तुमचं दबावतंत्र आहे का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, "एका महानगरपालिकेने आम्हाला काही फरक पडत नाही. हे प्रकरण मोठं आहे."
व्हिडिओ मॅन्यूपलेट केलेले आहेत असं म्हटलं जातंय? यावर फडणवीस म्हणाले, "सत्य समोर आलेलं आहे, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








