किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी 8 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल तर दोन पोलीस निलंबित

फोटो स्रोत, Getty Images
पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणाऱ्या शिवसेनेच्या 8 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस नाईकांना निलंबित करण्यात आलं आहे.
5 फेब्रुवारीला किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्की वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने येणार असल्याची गोपनीय माहिती न मिळाल्याने गोपयनीय शाखेतील दोन पोलीस नाईक दिलीप मोरे आणि सतीश कुंभार यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "पुण्यामध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्या प्रकरणात दिलीप मोरे, सतिष कुंभार दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि महानगरपालिकेचे दोन सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आलेला आहे."
"या सर्व प्रकरणातल्या मास्टर माइंडवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तो मंत्रालयात बसणारा असेल किंवा 'मातोश्री'मध्ये असेल किंवा संजय राऊत यांचा खास असेल. परंतु जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही," असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
यापूर्वी याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहाराध्यक्ष संजय मोरेंसह चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रुपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 10 कलमांअन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशांत दत्तु लाटे यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दुसरीकडे, झटापटीनंतर दुखापतग्रस्त किरीट सोमय्यांना पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं. काल, 6 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज मिळाला. सोमय्यांनीच ही माहिती ट्विटरवरून दिलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली. माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही," असं ते यावेळी म्हणाले.
नेमकी घटना काय घडली होती?
पुण्यात शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या पायऱ्यांवर कोसळले होते.
कोव्हिड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते.
मात्र, यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर कोसळले.
पुणे महानगरपालिकेच्या आवारात माझ्यावर शिवसेना गुंडांनी हल्ला केला आहे, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
शिवसेनेकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्यास ती इथं अपडेट करण्यात येईल.

फोटो स्रोत, Twitter/Chandrakant Patil
भाजप नेत्यांनी मात्र या प्रकारामुळे शिवसेना आणि सरकारवर कठोर टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय, "राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही.
"महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध."
प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना ते पुणे महानगरपालिकेला भेट देणार होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. या धक्काबुकीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले त्यांना सुरक्षारक्षकांनी बाजूला करून महापालिकेच्या बाहेर नेले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
किरीट सोमय्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी पालिकेत भ्रष्टाचार होत असून त्याचे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक पालिकेत आले होते. यावेळी पालिकेच्या जुन्या इमारतीत किरीट सोमय्या आल्यावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठ्याप्रमाणावर धक्काबुक्की झाली.
या धक्काबुक्की नंतर सुरक्षरक्षकांनी त्यांना बाहेर काढले. सध्या किरीट सोमय्या यांना पुण्यातील संचेती रुग्णांलयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
'सोमय्या यांना मुका मार लागला'
सोमय्या यांना मुका मार लागला आहे. त्यांच्या माकड हाडालादेखील मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
संचेती म्हणाले, "किरीट सोमय्या यांना रुग्णालयात आणलं त्यावेळी त्यांचा बीपी वाढलेला होता. पण आता नॉर्मल आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही.
"त्यांच्या हाताला प्लास्टर केलं आहे. त्यांना आरामाची गरज आहे. एक दिवस निगराणीखाली ठेवून उद्या सुटी दिली जाईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)