खत दर 2022 : खतांचे भाव नेमके किती वाढले आणि ते का वाढले?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, ज्ञानराज शिंदे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

खत आणण्यासाठी दुकानावर गेलेल्या बळीराम जुंबड यांना नैराश्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. कारण खतासाठी नेमके पैसे घेऊन गेलेल्या बळीराम यांना दुकानात गेल्यावर कळलं की खतांचे भाव वाढले आहेत, बळीराम यांच्यासारखे अनेक शेतकरी खताच्या किमती वाढल्याची झळ सोसत आहे.

खतांच्या किमतीत वाढ झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे.

एकीकडे खतांचे दर दुपटीने वाढले आहेत असं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे खताच्या गोणीवर जी प्रिंटेड किंमत आहे त्यापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे, असंही म्हटलं जात आहे.

त्यामुळे मग खत दरवाढीचं नेमकं हे प्रकरण काय आहे? खतांचे दर खरंच वाढलेत का? आणि यामागचं नेमकं कारण काय आहे? याच प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा हा प्रयत्न.

'खताचे दर वाढल्यामुळे खाली हात परतावं लागलं'

शेतकरी बळीराम जुंबड जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या वाघ्रळ गावात राहतात.

रबी हंगामातल्या पिकांसाठी त्यांना खतांची आवश्यकता असल्यानं ते दुकानावर गेले.

शेतकरी बळीराम जुंबड

फोटो स्रोत, BALIRAM JUMBAD

फोटो कॅप्शन, शेतकरी बळीराम जुंबड

याविषयीच्या अनुभव सांगतात, "मी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी म्हणजेच बाजरी, ज्वारी, मका आणि गहू पेरणीसाठी 10:26:26, 20:20:0:13 आणायला कृषी सेवा केंद्रावर गेलो होतो. तेव्हा खतांचे भाव वाढल्याचं कृषी केंद्र चालकानं सांगितलं. पण, माझ्याजवळ मोजकेच पैसे असल्यानं मला घरी परतावं लागलं."

खतांचे दर अचानक वाढल्यानं गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचंही जुंबड म्हणाले.

खतांचे दर किती वाढले?

खतांच्या आताच्या किंमतीविषयी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील खत पुरवठादार सोहन सावजी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "जवळपास सगळ्याच खतांच्या दरात वाढ झालेली आहे. 10:26:26, 20:20:0:13,14:35:14 अशा सगळ्या खतांमध्ये वाढ झाली आहे. पोटॅशमध्ये सर्वांत जास्त 700 रुपयांनी वाढ झालेली आहे. तर बाकीच्या खतांमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे."

प्रातिनिधिक फोटो
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पण, मग खतांचे दर का वाढले, असा प्रश्न उपस्थित होतो.

याविषयी सावजी म्हणाले, "विदेशातून फॉस्फरिक ॲसिड आयात करावं लागतं आणि त्याची किंमत विदेशातच वाढल्यानं त्याचा फटका भारतातील शेतकऱ्यांना बसणार आहे. जोपर्यंत केंद्र सरकार खतांवर सबसिडी देणार नाही तोपर्यंत खतांचे भाव कमी होणार नाही."

याच याविषयी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील कृषी सेवा केंद्राचे मालक राजू देहाडराय म्हणतात, "केंद्र सरकारनं केवळ DAP वरच सबसिडी दिल्याने त्याचा दर तटस्थ आहे. खतांवर सबसिडी नसल्यानं आणि कच्च्या मालाच्या आयातीमध्ये उशीर झाल्यानं खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे."

खतांवर अनुदान नाही?

केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. म्हणजेच खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रबी हंगामातील पिकांसाठी 2021-22 या वर्षाकरता फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) सबसिडी मंजूर करण्यात आली.

1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत या सबसिडीचा कालावधी निर्धारित करण्यात आला.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

यानुसार, 2021-22 च्या रबी हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.323 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलंय.

यामुळे DAP च्या एका गोणीमागे शेतकऱ्यांना 438 रुपये इतक्या अनुदाना लाभ मिळेल, तर NPK 10-26-26, NPK 20-20-0-13 & NPK 12-32-16 या खतांसाठी प्रत्येक गोणीमागे 100 रुपये अनुदानाचा लाभ मिळेल, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय.

त्यावेळी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं होतं, "सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि आपल्याला अनेक प्रकारची खतं आयात करावी लागतात. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी एमआरपीऐवजी सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मांडवीय पुढे म्हणाले होते, "युरियाचे अनुदान 1500 वरून 2000 रुपये प्रति बॅग, डीएपी 1200 वरून 1650 रुपये, एनपीके 900 वरून 1015 रुपये, एसएसपी 315 वरून 375 रुपये केले आहे. रब्बी हंगामासाठी खतांवरील अनुदानासाठी पंतप्रधानांनी एकूण 28,000 कोटी रुपये दिले आहेत."

'राज्य सरकानं खुलासा करावा'

खतांच्या दरवाढीबाबत राज्य सरकारनं खुलासा करावा, असं मत अभ्यासक व्यक्त करत आहे.

शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या मते,"डिसेंबर महिन्यात कॅनडाकडून तत्काळ दोन लाख टन पोटॅश आयातीसाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातला किती टन माल जानेवारी अखेरीस वा फेब्रवुारीत येईल, हे पुढे कळेलच.

"चांगल्या पाऊसमानामुळे यंदा रब्बीतील क्षेत्रात वाढ दिसत असल्यानं जानेवारीत पोटॅशसाठी मागणी वाढली. जागतिक बाजारात किंमत वाढत असताना केंद्र सरकार गाफिल राहिले का? खतांच्या मार्केट इंटेलिजन्स संदर्भात केंद्र सरकारकडे काही यंत्रणा काम करते का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत."

"राज्याच्या कृषी मंत्रालयाने केंद्र शासनाकडे पोटॅश उपलब्धतेबाबत पाठपुरावा केल्याचं दिसून येतं. मात्र, महाराष्ट्रातच एक हजार रुपये प्रिंटेड कॉस्ट असलेली पोटॅशची बॅग सतराशेला कशी काय विकली जातेय, याचा खुलासा राज्याचे कृषिमंत्री करतील का?," असाही सवाल चव्हाण उपस्थित करतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

दरम्यान, सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. तसेच ऊस, फळबागा, भाजीपाला, गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असं आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहिले आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)