विजय माल्ल्यांचं लंडनमधलं घर जप्त होणार

विजय माल्ल्या

फोटो स्रोत, Reuters

भारतीय बँकांचं कर्ज न फेडता देश सोडणारे उद्योगपती विजय माल्ल्या युके हायकोर्टात एका महत्त्वाच्या खटल्यात पराभूत झाले आहेत. त्यांचं लडनमधलं घरं बँक जप्त होऊ शकतं, असं कोर्टानं सांगितलं आहे.

स्विस बँक यूबीएस बरोबर सुरू असलेल्या या वादावर मंगळवारी व्हर्च्युअली सुनावणी झाली होती.

यावर निर्णय देताना न्यायाधिशांनी म्हटलं की, "बँकेकडून घेतलेलं 2.04 कोटी ब्रिटन पाऊंडचं कर्ज फेडण्यासाठी माल्ल्या कुटुंबाला आणखी वेळ देण्यासाठी काहीही ठोस कारण नाही. दुसऱ्या पक्षाचा युक्तिवाद योग्य असून त्यांना आणखी वेळ दिल्याने काही फायदा होईल, असं वाटत नाही."

जजने विजय माल्ल्या यांची विनंती फेटाळली. "या प्रकरणी अपीलची परवानगी दिली जात नाही. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे या प्रकरणी स्टेचा आदेश दिला जाऊ शकत नाही," असं जज म्हणाले.

कोर्टाच्या आदेशानंतर आता बँक ही संपत्ती जप्त करून कर्जाची भरपाई करू शकते. बँक लवकरात लवकर कोर्टाच्या आदेशाचं पालन करेल, असं बँकेच्या वकिलांचं म्हणणं आहे.

विजय माल्ल्या यांचं हे घर 'अत्यंत मौल्यवान मालमत्ता' असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं असून, त्याचं मूल्य हे, लाखों पाऊंड असू शकतं. माल्ल्या यांची कंपनी रोझ कॅपिटल व्हेंचर्सने हे घर गहाण ठेवून यूबीएस बँकेकडून कर्ज घेतलं होतं.

लंडनमधील रिजेंट पार्कजवळ असलेल्या 18/19 कॉर्नवॉल टेरेसच्या या घरात विजय माल्ल्या यांच्या 95 वर्षीय आई ललिता राहतात, असं सांगितलं जात आहे.

यापूर्वी या प्रकरणात मे 2019 मध्ये कोर्टाने माल्ल्या यांना कर्ज फेडण्यासाठी 30 एप्रिल 2020 पर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर कोव्हिड-19 च्या संकटामुळं लागू झालेल्या निर्बंधांमुळं हे प्रकरण मागं पडलं होतं.

विजय माल्ल्या मार्च 2016 ला भारत सोडून ब्रिटनला गेले होते. त्यांनी किंगफिशर या एअरलाईन कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते न फेडताच विदेशात निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

कर्जाची ही रक्कम जवळपास 10 हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. किंगफिशर एअरलाइन अत्यंत दूरवस्थेनंतर बंद झाली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)