विराट कोहली कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडताना धोनी आणि रवी शास्त्री यांच्याबद्दल म्हणाला...

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विराटनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दरम्यान, विराट कोहली भारतीय टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी संघाचा कर्णधार होता. आता रोहितकडे वनडे आणि ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद आहे.
ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माकडे ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.
त्यानंतर डिसेंबर 2021मध्ये वनडे संघाच्या कर्णधारपदीही रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली होती.
कोहलीनं ट्विटमध्ये काय म्हटलं?
विराट कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलं की, "मी गेल्या 7 वर्षांत संघाला नेहमी योग्य दिशेनं नेण्यासाठी परिश्रम घेतले. मी माझं काम पूर्ण ईमानदारीनं केलं. प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी थांबा घ्यायची वेळ येते आणि आता माझ्यासाठी कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणून थांबायची वेळ आली आहे.
"इतका प्रदीर्घ काळ देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक सहकाऱ्याचेही आभार मानतो. त्यांनीच हा प्रवास सुंदर बनवला. रवी शास्त्री आणि सपोर्ट ग्रूपचेही आभार मानतो. ते या गाडीमागचं इंजिन होते, ज्यांनी कसोटी क्रिकेटला सातत्यानं पुढे नेण्याचं काम केलं.
"माझ्यावर कर्णधार म्हणून विश्वास ठेवल्याबद्दल तसंच भारतीय क्रिकेटला समोर घेऊन जाण्याची क्षमता असलेली व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहिल्याबद्दल मी एम.एस. धोनीचेही मी आभार मानतो."
BCCI ची प्रतिक्रिया
तर विराट कोहलीने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून संघाला एका नव्या उंचीवर नेल्याचं बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियाने म्हटलंय.
BCCI ने ट्वीटमध्ये म्हटलंय, "टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं त्याच्या वाखाणण्याजोग्या नेतृत्त्व कौशल्यांबद्दल अभिनंदन. यामुळेच टीम एका नव्या उंचीवर गेली. 68 सामन्यांमध्ये त्याने टीमचं नेतृत्त्वं केलं आणि 40 सामने जिंकणारा तो सर्वाधिक यशस्वी कॅप्टन ठरला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
"विराट कोहलीनं टीम इंडियाचा कर्णधार म्हणून चांगली कारकिर्द गाजवल्याबद्दल त्याचं अभिनंदन. विराटनं भारतीय संघाला एका तंदुरुस्त युनिटमध्ये बदललं, ज्याने भारतात आणि बाहेरच्या देशातही प्रशंसनीय कामगिरी केली. यांतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील कसोटी विजय खास आहेत," अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)