वर्ध्यातील हॉस्पिटलच्या चेंबरमध्ये नवजात अर्भकांची हाडं आणि कवट्या

फोटो स्रोत, Getty Images
वर्ध्यातील कदम हॉस्पिटलच्या चेंबरमध्ये नवजात अर्भकांची हाडं आणि कवट्या सापडल्याने खळबळ उडली आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात पाच महिन्यांनी गर्भवती असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा कदम हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला.
त्यानंतर या प्रकरणी हॉस्पिटल मधील एका डॉक्टरासह तिघांना अटक झाली. मात्र पोलिसांच्या चौकशीदरम्यान हॉस्पिटलच्या बायोगॅस चेंबरमध्ये काही नवजात अर्भकांची हाडं आणि कवट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून पोलिसांनी डॉक्टर रेखा कदम, किशोर सहारे आणि नलू सहारे या तिघांना अटक केलीय.
आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहली. त्या मुलीचा कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात 30 हजार रुपयांमध्ये करण्यात आला. मात्र मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, असं पोलीस तपासात पुढे आलं आहे.
पीडीत मुलीची चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात डॉक्टर रेखा कदम यांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कदम हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात होत असून पुरावे हॉस्पिटल परिसरातच पुरले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात तपासणी केली. त्यात हॉस्पिटल परिसरातील एका बायोगॅस चेंबरमध्ये 53 मानवी हाडं आणि 11 कवट्या आढळून आल्या.

फोटो स्रोत, Thinkstock
पोलिस चौकशीमध्ये अनेक बाबी उघड झाल्या आहे. शासनमान्य गर्भपात केंद्रात गर्भपात केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याच्या नियमाला बगल देण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात सोनोग्राफी मशीनही पोलिसांनी जप्त केलीय.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एकूण आढळून आलेल्या हाडांचे अवशेष आणि कवट्यांची डीएनए चाचणी करून ते नेमके रेकॉर्डवर नोंद असलेल्याचे आहे का याचा तपास केला जाणार आहे. तसंच दवाखान्यात नोंदी असलेल्या गर्भपाताशिवाय मिळालेले गर्भ हे त्याचेच आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे.
सोबतच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? की महिला डॉक्टर एकटीच आहे याचाही तपास केला जाणार असल्याच प्रशांत होळकर यांनी सांगितलं.
रुपाली चाकणकरांचं पत्र
या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागतात याचा तपास करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनला दिले असल्याची माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
चाकणकर यांनी म्हटलं आहे की, "वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताची घटना उघडकीस आल्यानंतर पाच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पोलिसांनी अधिक तपास केला असता हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या बायोगॅस प्लॅन्टच्या जागेत पाच मृत अर्भकांच्या कवट्या आणि हाडांचे अवशेष सापडले आहेत. ही बाब अतिशय धक्कादायक आणि डॉक्टरी पेशाला व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा खोलवर तपास करून यामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागतात याचा तपास करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनला दिले आहेत."
भविष्यात अशा घटना घडूच नये यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)