बंगळुरूमध्ये शिवाजी पुतळ्याची विटंबना होण्याआधी घडल्या 'या' 5 घटना

शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रातिनिधिक फोटो
    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कर्नाटक आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरूद्ध कन्नड वाद पेटल्याचं वातावरण पाहायला मिळतंय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरूमध्ये विटंबना करण्यात आल्याने बेळगावातलं वातावरण तापलं आहे.

हे कृत्य काही समाजकंटकांनी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी अजूनही कुणावर कारवाई झाली नाही. मात्र या आधी काही अशा घटना घडल्या ज्यामुळं वादाची ही रांग सुरू झाली. त्या घटना नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊया.

1. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक

गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये 'विधानसौध' इथं घ्यायला सुरूवात केली आहे.

सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला इथल्या मराठी भाषिकांचा विरोध आहे. हाच विरोध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सिन डेपो इथं 13 डिसेंबर रोजी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

पण महापालिका आणि पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी दिली नव्हती. पण तरी समिती हा मेळावा घेण्यावर ठाम होती. यावेळी पोलिसांनी चर्चा करण्यासाठी अध्यक्ष दिपक दळवी यांना व्यासपीठामागे बोलावलं.

यावेळी दळवी यांच्यावर काही लोकांनी हल्ला करत दळवी यांच्यावर अॅसिडमिश्रीत रसायन फेकलं. याप्रकरणी दळवी यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. त्यावरून टिळकवाडी पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यात अशोक दड्डी आणि संतोषकुमार देसाई यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

2. कोल्हापूरमध्ये शाईफेकीचा निषेध

या घटनेचे 14 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये पडसाद उमटले. दळवी यांच्यावर शाईफेक करणाऱ्या कन्नड रशण वेदिके संघटनेचा कोल्हापूरमध्ये शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेचा लाल पिवळा ध्वज जाळण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज, बेंगळुरू, बेळगाव
फोटो कॅप्शन, बेळगावात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

3. शिवसेनेचा ध्वज जाळत निषेध

संघटनेचा ध्वज जाळल्याने आक्रमक होत 15 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या या कृत्याचा निषेध म्हणून कन्नड संघटनानी चित्रदुर्ग इथं शिवसेनेचा भगवा ध्वज जाळत प्रत्त्युत्तर देण्यात आलं.

4. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान

हे सगळं घडत असताना वातावरण शांत झालं असं वाटत असताना 16 डिंसेबरच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी बंगळुरू इथं सदाशिवनगर इथं शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर काळा रंग ओतला.

17 डिसेंबर रोजी ही बातमी सोशल मिडीयावर पसरल्याने संतप्त भावना व्यक्त होउ लागल्या. पण याचे पडसाद बेळगाव आणि कोल्हापूर इथं उमटले. बेळगाव इथं धर्मवीर संभाजी राजे चौकात शेकडो तरुण एकत्र आले. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवरोधात कारवाईच्या मागणीसाठी तरुणांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.

पुणे-बंगळुरt राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या बसेस अडवत शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
फोटो कॅप्शन, पुणे-बंगळुरt राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या बसेस अडवत शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी काही समाजकंटकांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. यात दगडफेकीच्या घटना घडल्या. एकुण 12 गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. यात 6 सरकारी गाड्या , पोलीसांच्या 4 गाड्या तर 2 खाजगी गाड्यांचा समावेश आहे.

यानंतर पोलिसांनी बेळगाव आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी 27 जणांना अटक करण्यात आली. यात श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांच कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांचा समावेश आहे. या सगळ्यांना आज (18 डिसेंबर) बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. या सगळ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

5. रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना

हे प्रकरण तापलेलं असताना 18 डिसेंबर रोजी बेळगाव इथल्या अनगोळ इथं काही समाजकंटकांनी रायन्ना संगोळी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याबाबत कर्नाटक राज्यात तीव्र संतापाची भावना व्यक्त करण्यात आली.

रायन्ना संगोळी यांना देशभक्त म्हणून ओळखलं जातं. रायन्ना हे राणी चेन्नमा यांच्या साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. त्यांनी 1824 मध्ये ब्रिटीशांविरोधात मोठा लढा दिला होता. पण 1831 मध्ये रायण्णा यांना फाशी देण्यात आली. त्यामुळं प्रखर राष्ट्रभक्त म्हणून रायण्णा यांना कर्नाटकात ओळखलं जातं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

ते म्हणाले, "जबाबदार लोकांनी कोणालाही भडकवू नये. शिवाजी महाराज, संगोळी रायण्णा, राणी चन्नम्मा यांनी देशाला एकत्र आणलं होतं. जर आपण त्यांची नावं घेऊन एकमेकांशी भांडू लागलो तर हे त्यांनी केलेल्या संघर्षावर अन्याय करण्यासारखं होईल."

महाराष्ट्रात कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक झाल्याच्या घटनेवर बोलताना बोमई म्हणाले, "महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड लोकांची सुरक्षा ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आमची जबाबदारी आहे, तशीच जबाबदारी महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्रात आहे."

वेळ पडल्यास मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बोलणार आहे, असंही बोमई म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बेळगावमधील घटनेप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही.

"कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावं."

दरम्यान, बेळगावसह आसपासच्या गावांमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमान केल्याचा निषेध करण्यात आला आहे. त्यामुळं सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)