Instagram : इन्स्टाग्रामवर हिट झालेली आई-मुलाची ही जोडी तुम्ही पाहिलीत का?

प्रज्ञा आणि प्रथमेश कदम

फोटो स्रोत, Instagram / Prathamesh Kadam

    • Author, शरद बढे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत यश मिळवणाऱ्या, स्वतःचं विश्व समृद्ध करणाऱ्यांचा प्रवास सांगणारी बीबीसी मराठीची ही मालिका.

इन्स्टाग्राम किंवा कोणताही सोशल मीडिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात तरूण इन्फ्लुएन्सर्स. पण याच इन्स्टाग्रामवर आई-मुलाची एक जोडी त्यांच्या धम्माल डान्स आणि कॉमेडीने लोकप्रिय झाली आहे. प्रज्ञा कदम आणि त्यांचा मुलगा प्रथमेश.

मुंबई राहणाऱ्या प्रज्ञा कदम आणि त्यांचा मुलगा प्रथमेश यांचे डान्स आणि रील्स सध्या तुफान हिट आहेत. घरातच शूट केलेले मायलेकाच्या या व्हिडिओजना हजारो व्ह्यूज मिळतात.

या सगळ्याला सुरुवात कशी झाली, याविषयी बोलताना प्रज्ञा कदम सांगतात, "आम्ही सहज म्हणून एक-दोन व्हिडिओज टाकले. घरगुतीच होते. माझे ते व्हिडिओ इतके व्हायरल झाले. पब्लिकने अक्षरशः मला डोक्यावर घेतलं. एकदा गाणं लागलं होतं - दो घूट मुझेभी पिलादे शराबी...गाणं लागलं म्हणून मी काम करता करता बाहेर आले. त्या गाण्यावर नाचायला लागले. प्रथमेशने मोबाईल ऑन करून ठेवल्याचं मला माहितच नव्हतं.

"भांडी घासतानाच मी बाहेर आले होते, मॅक्सी खोचून नाचताना प्रथमेशने शूट केलं. आणि ते व्हायरल झालं," 47 वर्षांच्या प्रज्ञा सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

2020मध्ये प्रज्ञा यांचे पती प्रकाश कदम यांचं कोरोना व्हायरसच्या संसर्गाने निधन झालं. पतीने कायमच आपल्याला साथ दिल्याचं प्रज्ञा सांगतात.

"माझे पती अगदी मोकळ्या स्वभावाचे होते. अगदी हल्लीच्या तरूण - तरुणींप्रमाणे आमचं एकमेकांवर प्रेम होतं. आम्ही फक्त नवरा-बायको नव्हतो. चांगले मित्रही होतो. कोणतंही काम असो, रील्स करायची असो वा बाहेर मीटिंगला जाणं - त्यांचा कायमच मला पाठिंबा असायचा. मी त्यांना खूप मिस करते."

पतीचं निधन झाल्यानंतरही नृत्याची त्यांची आवड जोपासायला त्यांना त्यांच्या मुलाने - प्रथमेशने प्रोत्साहन दिलं आणि त्यातूनच इन्स्टाग्रामवर रील्स करण्याची सुरुवात झाली.

प्रज्ञा आणि प्रथमेश कदम

फोटो स्रोत, Instagram / Prathamesh Kadam

पतीच्या निधनानंतरही नृत्य करते यावर लोक काय म्हणतील याचा विचार आपण करत नसल्याचं प्रज्ञा सांगतात. त्या म्हणतात, "लोकं मला काय म्हणतील याचा मी विचार करत नाही. जे मला आवडतंय, माझ्या कुटुंबाला आवडतंय. हाताची पाचही बोटं समान नसतात, बरोबर? सगळ्यांना आवडतं. काहींना नाही आवडंत. मी त्यांचं ऐकत नाही. मी माझं आयुष्य एन्जॉय करते.

"मी पुढे जावं अशी माझ्या मिस्टरांचीही इच्छा होती आणि त्यांच्या सपोर्टमुळे त्यांचं स्वप्न साकार होताना मला दिसतंय. मी इथपर्यंत आलेय. आम्ही नवराबायको होतो पण मित्र-मैत्रिणीसारखे रहायचो. ते याक्षणी हवे होते..."

प्रथमेश सांगतो, "वडील गेल्यानंतर आई खूप डिप्रेस झाली होती. ती कशी खुश राहील हाच विचार माझ्या मनात होता. त्या क्षणाला मीही एकटा पडलो होतो. पण मी ते दाखवलं नाही. आईला यातून बाहेर काढायचं, हेच माझं ध्येय होतं. तिला ज्या गोष्टी आवडतात त्या तिला आणून दिल्या. तिची रील्ससोबत ओळख करून दिली."

प्रथमेश आणि आई प्रज्ञा कदम त्यांच्या घरीच वेगवेगळे व्हिडिओज आणि रील्स तयार करून पोस्ट करतात. टिकटॉकपासून सुरू झालेला हा प्रवास आता इन्स्टाग्रामवर सुरू आहे.

प्रज्ञा आणि प्रथमेश कदम

फोटो स्रोत, Instagram / Prathamesh Kadam

सोशल मीडियावरच्या या प्रवासाविषयी प्रथमेश सांगतो, "मम्मीला कुठचीही गोष्ट सांगावी लागत नाही की तू असं कर, तसं कर...ती नॅचरली करते. तेच लोकांना जास्त आवडतं. मग कॉमेडी असो वा इमोशनल असो."

करोना काळात प्रथमेश आणि प्रज्ञा कदम करत असलेली लाईव्ह सेशन्स अनेक कोव्हिड पेशंट्सनी हॉस्पिटलमधून पाहिल्याचं प्रज्ञा सांगतात.

रील्स फेमस झाल्यापासून आपल्याला आता लोक ओळखायला लागल्याचं प्रज्ञा हसत हसत सांगतात.

सीरियल्समध्ये काम करण्याचं प्रज्ञा यांचं स्वप्न आहे. त्या म्हणतात, "मी सगळ्यांना इतकंच सांगीन की आयुष्यं आपलं आहे...तुमचं आयुष्य तुम्ही एन्जॉय करा. कोण काय म्हणतंय, ते ऐकू नका."

तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?

आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा [email protected]या ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.

  • तुमचं पूर्ण नाव
  • वय
  • तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती
  • या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?
  • तुमची (स्वतःच नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात
  • संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)