नरेंद्र मोदी म्हणतात, 'इथं औरंगजेब आला तर इथे शिवाजी महाराजही उभे ठाकतात'

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं ड्रीम प्रोजेक्ट श्री काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण केलं.
यावेळी ते म्हणाले, "काशी विश्वनाथ धामचा हा परिसर केवळ एक भव्य भवन नाही तर भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. हा परीसर भारताची अध्यात्मिक आत्मा, प्राचीनता आणि परंपरेचे प्रतीक आहे.
आधी हे मंदिर क्षेत्र केवळ तीन हजार स्क्वेअर फूट एवढे होते. आता ते जवळपास 5 लाख स्क्वेअर फूट एवढे करण्यात आले आहे. यामुळे आता मंदिरात 50 ते 75 हजार भाविक दाखल होऊ शकतात. आपल्या भाषणात मोदींनी, सर्व कारागीर, इंजिनिअर्सचे आभार मानले.
नरेंद्र मोदी म्हणाले, "इथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे राहतात. इथे कोणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेवसारखे वीर यौद्धे त्यांना आपल्या एकतेच्या ताकदीची जाणीव करून देतात. इंग्रजांच्या काळातही हेस्टिंगची अवस्था काशीच्या लोकांनी काय केली होती हे काशीतील लोक जाणतातच."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते पुढे म्हणाले, काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण भारताला एक निर्णायक दिशा देईल आणि एका उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल. आजचा भारत आपला वारसा पुन्हा सांभाळत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यावेळी मोदींनी जनतेला तीन संकल्प घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, "माझ्यासाठी जनता जनार्दन देवाचे रुप आहे. प्रत्येक भारतीय ईश्वराचा अंश आहे आणि म्हणूनच मी काही मागू इच्छितो. मी माझ्यासाठी नव्हे तर देशासाठी तीन संकल्प घेऊ इच्छितो - स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी निरंतर प्रयत्न."
"राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यनिष्ठेपासून चे वल्लभाचार्य, रामानन्दजी यांच्या ज्ञानापर्यंत चैतन्य महाप्रभू, समर्थगुरू रामदास यांच्यापासून ते स्वामी विवेकानंद, मदनमोहन मालवीय यांच्यापर्यंत कितीतरी ऋषींचा संबंध काशीच्या पवीत्र धरतीशी राहिला आहे."
ते पुढे असंही म्हणाले, "बनारस असं शहर आहे ज्याठिकाणाहून जगद्गुरु शंकाराचार्य यांनी श्रीडोम राजाच्या पवित्रतेपासून प्रेरणा मिळाली, त्यांनी देशाला एकता शिकवण्याचा संकल्प घेतला. ही ती जागा आहे जिथे भगवान शंकराच्या प्रेरणेपासून गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित मानस यांसारखी अविश्वसनीय रचना केली. ही कबीर आणि रैदास यांची भूमी सुद्धा आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)