पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीटर अकाऊंट हॅक

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक ट्वीटर अकाऊंट काही वेळासाठी हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली.
पंतप्रधानांचं वैयक्तिक अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरून बिटकॉईन संदर्भात ट्वीट करण्यात आलं. यानंतर ट्वीटर कंपनीला याची कल्पना देण्यात आली. तात्काळ हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
अल्प कालावधीसाठी हे अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. या वेळात अकाऊंटवरून जे ट्वीट करण्यात आलं त्याकडे दुर्लक्ष करावं असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर रात्री 2.11 ते 2.15 या कालावधीत या अकाऊंटवरून बिटकॉईन संदर्भात ट्वीट करण्यात आलं. भारताने बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारलं आहे असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. सरकार अधिकृत पातळीवर 500 बिटकॉईनची खरेदी करेल आणि नागरिकांमध्ये ते वितरित करण्यात येईल असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटमध्ये कथित घोटाळ्याची लिंकही देण्यात आली होती.
अकाऊंट हॅक झाल्याचं समजताच कार्यवाही करण्यात आली. थोड्या वेळात हे ट्वीट डिलिट करण्यात आलं. मात्र सोशल मीडियावर याचा स्क्रीनशॉट तसंच #hacked व्हायरल होतो आहे.
अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतरचं ट्वीटही डिलिट करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजकीय नेते, भाजप समर्थक यांनी ट्वीटरकडे विचारणा केली.
अकाऊंट हॅक करण्यामागे कोण व्यक्ती किंवा संघटना आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.
सप्टेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटशी संलग्न ट्वीटर अकाऊंट आणि मोबाईल अप हॅक अज्ञात गटाने करण्यात आलं होतं.
एखाद्याचं ट्विचर किंवा कुठलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होणं ही तशी नवी गोष्ट नाही. मोठ्या पदावरील व्यक्ती हॅकर्सना बळी पडल्या आहेत. 2019 साली ट्विटरचे तत्कालीन CEO जॅक डॉर्सी यांचंच ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. आता पंतप्रधानांचं अकाऊंटच हॅक झाल्याने भारतात सायबर सेक्युरिटीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. ट्विटर अकाउंटही कधी हॅक झाल्याची शक्यता असेल, तर काय करायचं? याविषयी आम्ही तज्ज्ञांना विचारलं. ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यास सर्वात आधी support.twitter.com/forms/signin या लिंकवर जाऊन तुम्हाला अकाऊंट हॅक झाल्याची माहिती तिथे द्यावी लागेल. योग्य उत्तरं दिलीत, तर तुम्हाला अकाऊंट रिकव्हर करता येईल. पण हा उपाय तेव्हाच चालेल, जेव्हा तुम्ही याविषयीची योग्य माहिती दिली असेल आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं असेल. म्हणजेच केवळ ईमेलवर अवलंबून न राहता अकाऊंटचं मोबाईल व्हेरिफिकेशनही करून घेणं महत्त्वाचं आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासवर्ड ब्राऊजरमध्ये सेव्ह करण्याऐवजी लक्षात ठेवणं उत्तम. दर ठराविक काळानं पासवर्ड बदलत राहा. सहज ओळखता येईल असा पासवर्ड ठेवणं टाळा . पासवर्डमध्ये स्पेशल कॅरेक्टर्स वापरा.
पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका. ईमेलमध्ये किंवा ट्विटरच्या इनबॉक्समध्ये आलेल्या लिंकवर खात्री केल्याशिवाय क्लिक करू नका.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








