अमोल कोल्हे: 'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो लावता तर डेथ सर्टिफिकेटची जबाबदारी पण घ्या'

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, Sansad TV

"जर लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर फोटो लावायचा असेल तर डेथ सर्टिफिकेटची जबाबदारी देखील घ्या," असा टोला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेमध्ये लगावला आहे.

देशातल्या कोरोना स्थितीवरून खासदार अमोल कोल्हेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली. 'लशीच्या प्रमाणपत्रावर फोटो ठेवत असाल तर डेथ सर्टिफिकेटचीही जबाबदारी घ्या,' असं ते म्हणाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

खासदार कोल्हे यांनी आज लोकसभेत भाषण केले. त्यांनी कोरोनाच्या स्थितीबद्दल आणि ओमिक्रॉनच्या भीतीबद्दल देशात जे वातावरण तयार झाले आहे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

खासदार कोल्हे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. नवीन व्हेरियंटचा सामना कसा करावा याबद्दल सरकारने रणनीती तयार करावी असं देखील ते म्हणाले.

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, Facebook/Amol Kolhe

सेनापतीने युद्धाच्या काळात नेतृत्व करावे लागते. जर विजयाचा मुकूट आपल्या डोक्यावर घ्यायचा असेल तर पराभवाची जबाबदारी देखील स्वीकार करायला हवी असे ते म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटीला त्यांनी एक कविता सादर केली. त्यात ते म्हणाले..

जंग के एक पडाव पर क्षती पहुंची तो क्या हुआ, हम बचेंगे तो और भी लढेंगे.

लेकिन कदम मिलाकर चलना होगा. नए जोश से प्रारंभ करना होगा.

वर्ना कहेंगे देशवासी..अगर जीत का सेहरा सिर बंधवाना है तो पराजय का बोझ भी स्वीकार करना होगा

अगर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटपर फोटो छपवानी है तो डेथ सर्टिफिकेट जिम्मा भी लेना होगा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)