क्रांती रेडकर: उद्धवजी, रोज आमच्या अब्रूची लक्तरं उधळली जातात; आज बाळासाहेब असते तर...

फोटो स्रोत, Instagram/Kranti Redkar
समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहीत न्याय देण्याचं आवाहन केलंय.
मी एक मराठी मुलगी असून माझ्याच महाराष्ट्रात मला धमकावलं जात असल्याचं क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं.
आता क्रांती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहित न्याय देण्याचं आवाहन केलंय. क्रांती रेडकर यांनी हे पत्र ट्वीट केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या पत्रात क्रांती म्हणतात,
"माननीय उद्धव ठाकरे साहेब,
लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले..कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं..तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे..लढते आहे..सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..
मी एक कलाकार आहे..राजनीती मला कळत नाही..आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही..आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरं चारचौघात उधळली जातात..शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे..विनोद करून ठेवला आहे..
आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं..एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे..आज ते नाही पण तुम्ही आहात..त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो..
तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे..तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे..म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय..तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती"
आपल्या कुटुंबाच्या संरक्षाची जबाबदारी सरकारने उचलावी अशी मागणी क्रांती रेडकर यांनी यापूर्वीही माध्यमांशी बोलताना केली होती. 'मी एक मराठी मुलगी आहे. जर मला काही झाली तर या मराठी जनतेला तुम्ही काय उत्तर देणार,' असा सवाल त्यांनी विचारला होता.
'माझे पती खोटे नाहीत, मग आम्ही हे का सहन करायचं. रोज रोज का सिद्ध करायचं? ट्विटर कोर्ट आहे का? ज्या माणसाचा 15 वर्षांचा रेकॉर्ड क्लीन आहे, त्याच्याबद्दल असं का म्हटलं जाईल?' असं म्हणत अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपले पती आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं समर्थन केलं होतं.
आरोह वेलणकर आणि मेघा धाडेचं क्रांतीला समर्थन
बिग बॉस विजेत्या मेघा धाडेनी क्रांती रेडकर यांनी पाठिंबा दिलाय. इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट करत मेघानी समीर वानखेडे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं म्हटलंय. वानखेडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांची जात, धर्म, लग्न, दिवंगत आई या सगळ्या गोष्टी खोदून काढून त्यांना त्रास दिला जात असल्याचं मेघा धाडेंनी म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
'क्रांती, तू खंबीर आहेस,' असं म्हणत मेघानी पाठिंबा दिलाय.
तर मराठी कलाकार क्रांतीला पाठिंबा द्यायला पुढे का येत नाहीत, असा सवाल अभिनेता आरोह वेलणकरने सोशल मीडियावरून केलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
'मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या मित्रमंडळींपैकी बहुतेकजण तुला उघडपणे पाठिंबा देत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. या लोकांनी तुझ्याविरुद्ध सुरू केलेली पी.आर. मोहीम व्यथित करणारी आहे. आपण अगदी जवळचे मित्र नाही, एकमेकांना फक्त ओळखतो, पण तरीही माझा तुला पाठिंबा आहे,' असं म्हणणाणरं ट्वीट आरोह वेलणकरने केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)