IPL 2022: आयपीएलमध्ये 2 नवीन संघांचा समावेश, दोन टीमची किंमत तब्बल 12,757 कोटी रुपये

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे.
संजीव गोयंकांच्या RPSG व्हेंचर्सनं लखनौ फ्रॅंचायझीसाठी 7090 कोटी रुपये मोजले आहेत. तर इरेलिया कंपनी (CVC capital Parteners) नी अहमदाबादसाठी मोजले 5625 कोटी रुपये मोजले आहेत.
दोन संघ विकत घेण्यासाठी इंग्लंड प्रीमिअर क्लबमधील संघ मँचेस्टर युनायटेड, द अदानी ग्रुप, टोरंट, हिंदुस्तान मीडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरपी संजीव गोएंका ग्रुप, कॅप्री ग्लोबल, सिंगापूरस्थित इर्लिया कंपनी लिमिटेड या उद्योगसमूहांची नावं चर्चेत होती.
महेंद्रसिंग धोनीचे व्यावसायिक व्यवहार पाहणारी ऱ्हिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचं नावही शर्यतीत होतं. दहा कंपन्यांची नावं अंतिम यादीत होती.
बीसीसीआयने आयपीएल संघ खरेदी करण्यासाठीची निविदा प्रक्रिया दोनदा वाढवली. नवा संघ खरेदी करण्यासाठी बीसीसीआयने 2000 कोटी रुपये बेस प्राईज निश्चित केली होती.
नव्या संघांसाठी अहमदाबाद, पुणे, लखनौ, कटक आणि गुवाहाटी या शहरांची नावं शर्यतीत होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आजच्या बोलीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आयपीएल आता लखनौ आणि अहमदाबाद या भारतातील दोन नवीन शहरांमध्ये जाईल. इतक्या उच्च मूल्यांकनावर दोन नवीन संघांचा समावेश पाहून आनंद होत आहे आणि यातून आमच्या क्रिकेट इकोसिस्टमचं आर्थिक सामर्थ्य यातून दिसून येतं."
'व्हेअर टॅलेंट मीट्स अपॉर्च्युनिटी' या आयपीएलच्या ब्रीदवाक्यानुसार, दोन नवीन संघांच्या समावेशामुळे आपल्या देशातील आणखी देशांतर्गत क्रिकेटपटूंना जागतिक स्तरावर आणले जाईल, असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
BCCIचे सचिव जय शाह यांनी म्हटलं की, "आम्ही आश्वासन दिलं होतं की, आयपीएल 15 व्या हंगामापासून मोठं आणि आणखी चांगलं होईल. लखनौ आणि अहमदाबादसह आम्ही ही लीग भारताच्या विविध भागात घेऊन जाऊ.
"कोविड-19 नं अनेक आव्हाने उभी केली असूनही आयपीएलचे 13वे आणि 14वे हंगाम पूर्ण झाले. इच्छुक पक्षांचा BCCI आणि त्याच्या होस्टिंग क्षमतेवर विश्वास असल्याचं आजच्या बोलींमधून सिद्ध झालं."
आयपीएलमधील संघांचे तपशील
- चेन्नई सुपर किंग्स- इंडिया सिमेंट्स (चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड)
- दिल्ली कॅपिटल्स- जीएमआर ग्रुप (जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप)
- पंजाब किंग्ज- मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि सप्तर्षी डे
- कोलकाता नाईट रायडर्स-रेड चिलीज एंटरटेनमेंट अँड मेहता ग्रुप
- मुंबई इंडियन्स- रिलायन्स इंडस्ट्रीज
- राजस्थान रॉयल्स- इमर्जिंग मीडिया (अमिशा हथीरामानी, मनोज बेदाळे, लाचलन मर्डोक, रायन कलेव्हिक, शेन वॉर्न)
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- युनायटेड स्पिरीट्
- सनरायझर्स हैदराबाद- डेक्कन क्रोनिकल्स (सन टीव्ही नेटवर्क)
- लखनौ फ्रॅंचायझी- RPSG व्हेंचर्स
- अहमदाबाद - इरेलिया कंपनी
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








