नवज्योतसिंग सिद्धू यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे

सिद्धू, पंजाब, काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

पंजाबमधील काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे.

सिद्धू यांना याच वर्षी 19 जुलै रोजी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचं मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांची त्या पदावर निवड करण्यात आली होती.

मात्र, चन्नी यांनी निवडलेले मंत्री तसंच अधिकारी या निर्णयाशी असहमती दर्शवून सिद्धू यांनी आपला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर आता तब्बल दीड महिन्यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीमाना मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.

पण त्यासाठी त्यांनी काही अटीही घातल्याचं दिसून येत आहे.

शेवटपर्यंत लढत राहू - नवज्योत सिंग सिद्धू

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हीडिओ ट्वीट करून म्हटलं होतं की, अधिकार आणि सत्याची लढाई शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू.

व्हिडिओत ते म्हणतात, "प्रिय पंजाबी बांधवांनो, मी माझा 17 वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला आहे. तो म्हणजे पंजाबमधील लोकांचं आयुष्य अधिक सुकर करणं आणि मुद्द्यांच्या राजकारणात एक भूमिका घेऊन ठामपणे उभं राहणं. हाच माझा धर्म आहे आणि कर्तव्यही आहे. आजही माझं कोणाशी वैयक्तिक भांडण नाहीये."

"मी नेहमीच अधिकारांची लढाई लढलो आहे आणि त्यात कधी कोणतीही तडजोड केलेली नाही. माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे की, जेव्हा कोणतंही द्वंद्व असेल, तेव्हा सत्यासोबत उभं राहणं आवश्यक आहे. नैतिकतेसोबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पण सध्या याच मुद्द्यावर तडजोड होताना दिसत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं.

"सहा वर्षांपूर्वी ज्यांनी बादल कुटुंबाला क्लीन चीट दिली, त्यांच्याकडेच उत्तरदायित्व सोपविण्यात आलं. मी स्वतः हाय कमांडची दिशाभूल करू शकत नाही आणि त्यांची दिशाभूल होऊ देऊ शकत नाही. गुरूंनी सांगितलेल्या न्यायासाठी, पंजाबच्या लोकांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी मी कोणत्याही गोष्टीचा त्याग करू शकतो.

सिद्धू यांनी अॅडव्होकेट जनरल पदावर झालेल्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

त्यांनी म्हटलं की, जे ब्लँकेट बेल करत होते, तेच आज अॅडव्होकेट जनरल झाले आहेत.

त्यांचा रोख अमर प्रीत सिंह देओल यांच्याकडे होता. दोनच दिवसांपूर्वी देओल यांना चन्नी सरकारनं पंजाबच्या अडव्होकेट जनरल पदावर नियुक्त केलं आहे.

प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी (28 सप्टेंबर) पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेससाठी पुढे काम करत राहू असं देखील त्यांनी राजीनाम्यानंतर म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

'तडजोडी करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते, पंजाबच्या भवितव्याबाबत मी कधीच तडजोड करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे,' असं सिद्धू यांनी म्हटलं.

या पुढे काँग्रेसचे काम करत राहील असं देखील नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना म्हटलं आहे.

रोज नवे राजकीय नाट्य

पंजाबमधील राजकीय नाट्य दररोज नवे वळण घेत आहे.

सिद्धू, पंजाब, काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवज्योतसिंग सिद्धू

"पंजाबचं भवितव्य आणि पंजाबच्या नागरिकांचं कल्याण यासाठी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे मी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहीन", असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रकात म्हटलं आहे.

सिद्धू यांनी केलेल्या बंडामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनामा दिला. त्यानंतर चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.

सिद्धूंनी राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी ट्विट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

'मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की ते स्थिर नाहीयेत. पंजाबसारख्या सीमेलगतच्या राज्यासाठी ते योग्य देखील नाहीत,' असा चिमटा अमरिंदर यांनी नाव न घेता काढला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)