सोनू सूदने 20 कोटींची करचोरी केली - आयकर विभाग

फोटो स्रोत, @sonusood
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची करचोरी केल्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाने दिली आहे.
आयकर विभागाने गेल्या तीन दिवसांपासून सोनू सूदच्या मुंबई येथील निवासस्थानी तपास केला. त्यानंतर एक प्रसिद्धीपत्रक काढून शनिवारी वरील माहिती दिली आहे.
48 वर्षीय सोनू सूद नुकताच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर बनला आहे.
आयकर विभागाच्या मते, सोनूच्या स्वयंसेवी संस्थेने 2.1 कोटी रुपये परदेशातून क्राऊड फंडींगच्या माध्यमातून जमवले आहेत. हे परदेशी योगदान (विनिमय) कायद्याचा उल्लंघन आहे.
सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर टॅक्स चोरी करण्यात आल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत,
सोनू सूदने आपलं अघोषित उत्पन्न बनावट स्त्रोतांमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाच्या स्वरुपात दाखवलं होतं, असं आयकर विभागाने म्हटलं.
आतापर्यंत 20 बनावट नोंदी विभागाला आढळून आल्या. यामध्ये रोख रकमेऐवजी चेक देण्यात आलं होतं. त्याशिवाय अधिकाधिक पावत्या टॅक्स वाचवण्यासाठी लोनप्रमाणे दाखवण्यात आल्या.
तसंच बनावट लोनचा वापर गुंतवणुकीसाठी आणि संपत्ती खरेदी करण्यासाठी करण्यात आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची टॅक्स चोरी करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इन्कम टॅक्स विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 21 जुलै 2021 रोजी सोनू सूदने स्थापन केलेल्या चॅरिटी फाऊंडेशनने 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत 18.94 कोटी रुपयांचा मदतनिधी गोळा केला. यापैकी 1.9 कोटी रुपये विविध मदतकार्यांमध्ये खर्च करण्यात आले. तर 17 कोटी रुपये अद्याप खात्यात पडून आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तपासादरम्यान 1.8 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर 11 लॉकर सिल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात सोनू सूदशी संबंधित लखनौमधील एका कंपनीचंही नाव आलं आहे. बनावट बिलिंग, बनावट कंत्राट आणि खर्चात फेरफार यांमध्ये ही कंपनी सहभागी होती, असा आरोप आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बनावट कंत्राटाची किंमत 65 कोटी रुपये आहे. टॅक्स चोरीची पूर्ण माहिती घेण्यासाठी तपास सुरू आहे."
आयकर विभागाने केलेल्या आरोपांवर सोनू सूदने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोरोना काळात मदतीमुळे आला होता चर्चेत
सोनू सूदने कोरोना लॉकडाऊन काळात अनेक गरजू लोकांची मदत केली होती. लोकांना जीवनावश्यक साहित्य देणं, विविध ठिकाणी अडकलेल्या मजूरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणं, यामुळे तो चर्चेत आला होता. सोनू सूदचं नाव सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड करत असतं. त्याला इतरांसाठीचा प्रेरणा स्त्रोत, मसीहा म्हणून संबोधलं जात आहे.

फोटो स्रोत, Sonusood
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोनू सूदचे अनेक व्हीडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर्सची डिलिव्हरी करताना तो स्वतः दिसतो. याशिवाय सोनू सूदच्या आवाहनानंतर कोरोनाबाधित लोकांच्या मदतीसाठी भरघोस निधी जमा करण्यात आला होता.
सोनू सूदकडून प्रेरणा घेत आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील सालुरू तालुक्यातील आदिवासींनी आपल्या गावात रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला होता. ते सुद्धा कोणत्याही अधिकारी अथवा सरकारी मदतीशिवाय ते हा रस्ता बांधणार होते.
आम आदमी पक्षासोबत
दरम्यान, सोनू सूद राजकारणात प्रवेश घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सोनूलाही याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण त्याने याचं स्पष्ट उत्तर कधीच दिलं नाही.

फोटो स्रोत, Twitter
सोनू सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतो, असा अंदाज अनेकवेळा लावण्यात आला. पण काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एका व्यासपीठावर येऊन त्याने लोकांना आश्चर्यचकित केलं.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने आपल्या देश के मेंटोर कार्यक्रमासाठी सोनू सूदला ब्रँड अॅम्बेसिडर बनवलं.
या कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. याच कार्यक्रमाच्या घोषणेदरम्यान दोघे एकत्र दिसले होते.
सोनू सूदचा जन्म पंजाबच्या मोगा जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे तो आम आदमी पक्षासोबत आल्यास पंजाबात पक्षाची स्थिती चांगली होईल, असं म्हटलं जात होतं.
पण सोनू सूदने आपण राजकारणात येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
सोनू सूदला बॉलीवूडमध्ये जोधा अकबर (2008) आणि दबंग (2010) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्याने प्रसिद्धी मिळाली.
सलमान खानच्या दबंग चित्रपटात सोनूने छेदी सिंह नामक खलनायकाची भूमिका केली होती. याच पात्राने त्याला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्याने अनेक भूमिका केल्या. पण छेदी सिंहसारखी प्रसिद्धी कुठेच मिळाली नाही.
2010 नंतर सोनूचं हिंदी चित्रपट करिअर इतकं विशेष चालत नाही. यादरम्यान हिंदीतील छोट्या बजेटचे चित्रपट तसंच तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये सोनू सातत्याने काम करताना दिसतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








