सुधीर मुनगंटीवार- '...तेव्हा भाजप शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करेल' #5मोठ्याबातम्या

मुनगंटीवार

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) '...तर भाजप शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करेल'- सुधीर मुनगंटीवार

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची काल (3 जुलै) मुंबईत गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळ तर्क-वितर्कांना सुरुवात झालीय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.

मुंबईतल्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील भेटींचा सिलसिला पाहताना या भेटीमुळे चर्चेलाही उधाण आलंय.

आशिष शेलार, संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

या भेटीवर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यात भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, भाजप शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न करणार नाही.

मात्र, "राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते परततील, तेव्हा भाजप विचार करेल," असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

2) सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाहीत - धनंजय मुंडे

"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. चळवळ चांगली केली, तर चळवळीतून प्रश्न मार्गी लागतात," असं मत धनंजय मुंडे यांनी खासदार संभाजीराजे यांच्या विधानावर व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रिपदी बसवा," असं खासदार संभाजीराजे बीडमध्ये बोलताना म्हणाले होते.

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Twitter/@dhananjay_munde

काल (3 जुलै) बीडमधील परळीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंना बरेच प्रश्न विचारले.

या प्रश्नांनंतर आक्रमक झालेल्या संभाजीराजेंनी म्हटलं, "तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही."

'मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मला मुख्यमंत्री करा,' असं संभाजीराजे म्हणाले.

3) पोलीस शिपाई निवृत्त होईपर्यंत PSI होणार

पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना आता निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत पोहोचता येईल, ही माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ई टीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

5-6 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयात विशेष बैठक घेऊन यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचेही दिलीप वळसे पाटलांनी सांगितले.

आजच्या घडीला पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेला उमेदवार निवृत्तीपर्यंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचतो. पण आता पोलीस शिपायाला निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येईल.

4) व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत - मोदी

आमचं सरकार व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरण करण्यास वचनबद्ध आहे, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

"किरकोळ व घाऊक व्यापाराला मध्यम व लघू उद्योगांचा दर्जा देण्याचा निर्णय महत्त्वाचा असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना अग्रक्रमाच्या क्षेत्राचे लाभ मिळू शकतील," असंही मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

मोदी पुढे म्हणाले, "कोट्यवधी व्यापारी बांधवांचा आता फायदा होणार आहे. वित्त पुरवठा आणि इतर मदतीत फायदे होतील, तसंच उद्योग वाढण्यास मदत होईल."

5) पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतमोजणी करा, 8 भाजप नेते कोलकाता हायकोर्टात

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुन्हा मोजणी करावी, या मागणीसह भाजपच्या आठ नेत्यांनी कोलकाता हायकोर्टाचे दार ठोठावले आहेत. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

या मागणीच्या याचिकेवर कोलकाता हायकोर्टात सोमवारी (5 जुलै) सुनावणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मनिकटोला इथून पराभूत झालेले कल्याण चौबे यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केलीय,.

ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजपनंही हायकोर्टाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या तिथून पराभूत झाल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)