शरद पवार : 'ईडीचे छापे आम्हाला नवे नाहीत, आम्हाला चिंता वाटत नाही'

फोटो स्रोत, @PawarSpeaks
रामटेकचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"या गोष्टी काही आम्हाला नव्या नाहीत. आम्हाला याची चिंता वाटत नाही, अनिल देशमुख हे काही पहिलेच नाहीत. राज्यकर्त्यांनी हा पायंडा पाडलेला आहे. आम्हाला व्यक्तींची चिंता वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या हाती काही लागलेलं नाही. नैराश्येपोटी आणखी काही मिळतंय का हे शोधलं जातंय," असं अनिल देशमुख यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या छाप्यांप्रकरणी प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलंय.
"जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दाबण्याचा प्रयत्न यंत्रणेचा वापर करून केला जातो. महाराष्ट्रात यापूर्वी कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्रात हे सरकार आल्यानंतर हे आलं," असा आरोपही पवार यांनी केला आहे.
काश्मीरच्या नेत्यांशी चर्चा झाली हे चांगलं आहे, पण पूर्वी जशा घोषणा केल्या आणि पुढे काहीच झालं नाही, असं होऊ नये, अशी सूचनासुद्धा शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीविषयीचा गैरसमज मीडियामुळे पसरला असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही बैठक कुठलही राजकीय बैठक नव्हती, असंही पवार यांनी स्पष्ट केलंय.
आघाडीसाठी चर्चा केलेली नाही. पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर काँग्रेसला घेऊनच करावी लागेल, असं माझं मत आहे, त्या बैठकीतसुद्धा मी हे मत मांडलं, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पक्षांनी एकत्र येऊन पर्याय उभा करावा अशी लोकेच्छा असते, मी राजकीय पक्षांना एकसंध ठेवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम करतो, आतापर्यंत असे उद्योग खूपवेळा करून झाले आहेत, असंही पवार यांनी मिश्किलपणे म्हटलंय.
ही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








