कोरोना व्हायरसचा 'हा' नवीन व्हेरियंट भारतात आढळला, तो किती धोकादायक?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास जाणारा AY.1 व्हायरसचाच नवीन व्हेरियंट देशात आढळल्याचं भारताने 15 जून रोजी अधिकृतपणे मान्य केलंय.

AY.1 म्हणजेच B.1.617.2.1 च्या या नवीन म्यूटेशनला K417N म्हटलं जातंय. हा व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य असून याचा संबंध बीटा व्हेरियंटशी आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा हा व्हेरियंट आढळला होता.

कोव्हिड 19च्या लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी (15 जून) एका पत्रकारपरिषदेत सांगितलं, "हा व्हेरियंट पहिल्यांदा मार्च महिन्यात युरोपात ओळखला गेला होता. पण दोनच दिवसांपूर्वी तो लोकांमध्ये आढळला होता.

हो, कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला आहे. पण अजूनतरी चिंता करण्याची बाब नाही. याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहित नाहीत. आम्ही याचा अभ्यास करतोय. भारतातल्या या व्हेरियंटच्या संसर्गाबद्दलही अभ्यास सुरू आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

भारतातल्या पाच प्रयोगशाळांकडून नवीन व्हेरियंट्सचा डेटा GISAID या जागतिक संस्थेला देण्यात आल्याची बातमी 14 जून रोजी 'द हिंदू' वर्तमानपत्राने छापली होती.

7 जूनपर्यंत GIASAID कडे भारताकडून 63 जीनोम आल्याचं ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड संस्थेने म्हटलंय. यामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि कर्नाटकमध्ये AY.1 व्हेरियंट असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

डॉ. पॉल म्हणाले, "म्युटेशन्स हे एक जैविक सत्य आहे. आपल्याला बचावात्मक उपाययोजना करायला हव्यात. या विषाणूला पसरण्याची संधी मिळणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

भारतामध्ये नोवाव्हॅक्स आलं असून याचे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याचं डॉ. पॉल यांनी म्हटलंय.

डॉ. पॉल म्हणाले, "नोवाव्हॅक्स अतिशय सुरक्षित असल्याचं आणि त्याची इफिकसी अत्यंत चांगली असल्याचं आपल्याला माहित आहे. भारतामध्ये आता आणखी एक लस उपलब्ध असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा."

नोवाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी असून भारतामध्ये ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत NVX-CoV2373 लशीची निर्मिती करत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)