करण मेहरा वाद प्रकरण : निशा रावल म्हणते, 'विवाह वाचवण्यासाठी मी इतकी वर्षे शांत बसले होते'

फोटो स्रोत, facebook
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सिरीयलमध्ये 'नैतिक' नावाचं पात्र साकारणारा अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात पेटलेल्या भांडणाने गंभीर स्वरूप घेतल्याचं दिसून येत आहे.
सोमवारी निशा रावलने करणवर मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी FIR दाखल करून त्याला अटक केली होती. करणला जामीन मिळाल्यानंतर त्याने निशा रावलवर अनेक गंभीर आरोप लावले.
आता निशानेही करणवर प्रत्यारोप केला आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना निशा रावल म्हणाली, 'मी करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे.'
एका अभिनेत्यासाठी त्याचं करिअर आणि त्याची इमेज खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मी याबाबत बाहेर कुठे बोलत नव्हते. तसं असूनही मला या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. करणचे विवाह-बाह्य संबंध आहेत. मी माझा विवाह वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुलाची जबाबदारी घेण्यासाठी तो तयार नाही. तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माझ्यावर अत्याचार करत आहे. माझ्याकडे त्याचे पुरावेही आहेत.
निशा इतके दिवस शांत का राहिली, हा प्रश्नही निशाला विचारण्यात आला.
त्याचं उत्तर देताना ती म्हणाली, "मी करणवर प्रेम करते, त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. तो प्रत्येकवेळी माफी मागत होता. इथून पुढे असं करणार नाही, असं तो म्हणायचा. मीसुद्धा त्याला माफ करत होदत. पण आता मी शांत न बसण्याचा निर्णय घेतला आहे."
2014 दरम्यान निशा बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त होती. त्याच काळात निशाचं एक मिसकॅरेजही झालं. पण इतकं होऊनसुद्धा करण आपल्यासोबत नव्हता. तो पूर्णपणे माझ्यापासून वेगळा झाल्याप्रमाणे राहत होता, असा आरोपही निशा रावलने केला आहे.
खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न - करण मेहरा
तर करणने जामिनावर बाहेर आल्यानंतर आपली बाजू स्पष्ट केली आहे. निशा रावलने त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. शिवाय, स्वतःच डोकं भिंतीवर आपटून घेतलं. नंतर ते मी केल्याचा आरोप तिने केला आहे.
याशिवाय निशाच्या भावाने त्याला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला होता. पण हे सगळं घडत असताना घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, असंही त्याने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








